Maharashtra Vanrakshak Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वनरक्षक भरती 2024 साठी बरीच उमेदवार प्रयत्न करत असतील, त्यांच्यासाठी भरती विषयी संपूर्ण माहिती ही माहित असायला हवी. म्हणून या लेखात आपण याच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसे की Maharashtra Vanrakshak Exam Pattern तसेच Physical Test Criteria आणि त्यासाठी लागणारे Study Materials. तर चला जाणून घेऊया, वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या माहिती विषयी.
Table of Contents
Maharashtra Vanrakshak Bharti 2024 Exam Pattern
वनरक्षक भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा एक महत्त्वाची मानली जाते. त्यासाठी परीक्षेमध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा तसेच सामान्य ज्ञान आणि गणित व बुद्धिमत्ता हे विषय फार महत्त्वाचे असतात. त्यासाठी असणारे गुण आणि प्रश्नांची संख्या खाली दिलेली आहे.
विषय | एकूण प्रश्नांची संख्या | एकूण गुण |
मराठी भाषा | 15 | 30 |
इंग्रजी भाषा | 15 | 30 |
सामान्य ज्ञान | 15 | 30 |
गणित व बुद्धिमत्ता | 15 | 30 |
एकूण प्रश्नांची संख्या व गुण | 60 | 120 |
● परीक्षेचे स्वरूप आणि अटी
1.यातील प्रश्नांची एकूण संख्या 60 असणार आहे.
2.तसेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिले जातील.
3.यासाठी संपूर्ण वेळ ही 120 मिनिटे दिली जाणार.
4.लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45% गुण घेणे आवश्यक आहे.
Maharashtra Vanrakshak Bharti 2024 Physical Test Criteria
वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षांमध्ये पात्र ठरल्यानंतर, शारीरिक चाचणी ही होत असते. या चाचणीच्या माध्यमातून उमेदवारांची कार्यक्षमता आणि शारीरिक क्षमता कळत असते.
मापदंड | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार |
उंची | किमान 163 सेमी | किमान 150 सेमी |
छाती | सामान्य: 79 सेमी, फुगवून: 84 सेमी | लागू नाही |
धावणे | 5 कि.मी. – 17 मिनिटे | 3 कि.मी. – 12 मिनिटे |
टीप:- भरतीसाठी पुरुष उमेदवारांना 17 मिनिटात 5 किलोमीटर धावणे आवश्यक आहे. आणि तसेच महिला उमेदवारांसाठी 12 मिनिटांत 3 किलोमीटर धावणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला रनिंग चे पूर्ण गुण मिळतील.
Maharashtra Vanrakshak Bharti 2024 Important Books
महाराष्ट्र वनरक्षक भरतीमधील परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी, काही महत्त्वाचे पुस्तके खाली दिलेले आहेत. ही पुस्तके वाचून चांगले गुण मिळू शकता.
1. मराठी भाषा : मराठी व्याकरण, सामान्य मराठी भाषाशास्त्र – वि.दा. घाटे, बालभारती
2. इंग्रजी भाषा : English Grammar and Composition – Wren & Martin
3. सामान्य ज्ञान : महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल, सामान्य विज्ञान – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ, Lucent
4. गणित व बुद्धिमत्ता : Quantitative Aptitude, मानसिक क्षमता – R.S. अग्रवाल, R. Gupta
वरील सांगितलेली पुस्तके तुम्ही वाचू शकता. तसेच तुम्हाला आणखी चांगले गुण मिळवण्यासाठी, चालू घडामोडी, तसेच दैनंदिन वृत्तपत्र आणि मागील वर्षीचे पेपर वाचू शकता.
Maharashtra Vanrakshak Bharti Tips
1,परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या. परीक्षेत असलेल्या विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून, त्यांचा वाचन करा.
2.शारीरिक चाचणीचा चांगला सराव करा. वेळेत धावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची धावण्याची क्षमता वाढेल.
3.अभ्यास करण्यासाठी चांगली पुस्तके वाचा. चालू घडामोडी तसेच नियमित वृत्तपत्रे वाचत रहा.
Maharashtra Vanrakshak Bharti 2024 साठी भरतीची तयारी करत असताना, परीक्षेचा स्वरूप तसेच शारीरिक चाचणी आणि इतर वाचनासाठी पुस्तके, या लेखात सांगितलेली आहेत, त्याच्यावर देखील तुम्ही भर देऊ शकता.
महत्वाची टीप: अर्ज करण्याआधी भरतीची अधिकृत जाहिरात बघावी, तसेच भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन माहिती मिळवावी.