BMC Licence Inspector Bharti 2024 – निरीक्षक पदांसाठी निघाली मोठी भरती; पदवीधारक करू शकतात अर्ज !! 

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

BMC Licence Inspector Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो तुम्ही जर पदवीधारक असाल व नोकरीच्या शोधात असला तर तुमच्या साठी ही नोकरीची उत्तम संधी ठरणार आहे. या भरती जाहिरातीमध्ये “अनुज्ञापन निरीक्षक” या पदांच्या जागा रिक्त आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या भरती मंडळाने एप्रिल च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 118 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो तुम्ही जर सदर पदांसाठी पात्र व इच्छुक असाल तर थोडा ही वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करा. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत नोकरीची ही संधी गमावू नका.

मित्रांनो, तुम्हाला सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तसेच तुम्ही सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर Brihanmumbai Municipal Corporation म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर किलक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत व त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी तुम्ही काहलि दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात.

BMC Licence Inspector Bharti 2024:Vacancy Details

पदाचे नाव :- License Inspector (परवाना निरीक्षक)

एकूण रिक्त जागा :- 118 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (Mumbai)

वयोमर्यादा :- परवाना निरीक्षक या पदाकरिता दिनांक 31/12/2023 रोजी पर्यंत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांचे वय 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत

ऑनलाइन परीक्षा शुल्क :-खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- रु. 1000/- (सर्व करासहित)मागसप्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 900/- (सर्व करासहित)परीक्षा शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन परीक्षा (ऑनलाइन मोड) उपलब्ध आहे. सदर परीक्षा शुल्क ही ना-परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी हा परिपत्रक प्रसारित झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या कालावधीकरिता असेल.

BMC Licence Inspector Bharti 2024:Educational Qualification

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
1License Inspector (परवाना निरीक्षक)● उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
● मराठी भाषा – उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
● संगणकाचे ज्ञान – उमेदवार डीओईएससीसी सोसायटीचे “सीसीसी” किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तर स्तरांवरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे ‘एम.एस.सी.आय.टी’ किंवा ‘जीईसीटी’ चे प्रमानपत्रधारक असावा.
● सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरीता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी /वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहायक व तत्सम पदावर दिनांक31 /12/2023 रोजी पर्यंत किमान 05 वर्षे नियमिततत्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा.

BMC Licence Inspector Bharti 2024: Selection Process

  • अनुज्ञापन निरीक्षक पदाकरिता घेण्यात येणारी परीक्षा ही भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
  • मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.
  • सदर पदासाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेमध्ये किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची त्यांच्या लिपिक व तत्सम संवर्गातील पदांवरील उमेदवारांची सामाईक गुणवत्तेच्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड यादी तयार करण्यात येईल.
  • बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवडयादी तयार करताना दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • उपरोक्त निकष लागुनही उमेदवाराची गुणवत्ताक्रम समान येत असल्यास, अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम त्यांच्या आडनावाच्या आद्याक्षरानुसार निश्चित करण्यात येईल.
  • अनुज्ञापन निरीक्षक या पदावरील ज्येष्ठता निवड यादीतील गुणाप्रमाणे राहील. तसेच, निवडीचे आदेश आल्यानंतर उमेदवाराला विहित कालावधीत म्हणजेच 02 महिन्याच्या आत रुजू होणे आवश्यक आहे.
  • मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 20 एप्रिल 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे 2024

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

Download PDF(जाहिरात):- ➡️येथे क्लिक करा⬅️

BMC Licence Inspector Bharti 2024: Salary Details

वेतन/मानधन :- दरमहा रु. 29,200/- ते रु. 92300/- पर्यंत

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा