स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

Dr. Rajendra Prasad Scholarship 2026: पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज

Date:

मित्रांनो, पैशांअभावी कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये यासाठी वेळोवेळी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. आज आम्ही Formwalaa च्या माध्यमातून तुमच्यासाठी अशीच एक अत्यंत महत्त्वाची शैक्षणिक अपडेट घेऊन आलो आहोत.

‘बडी४स्टडी’ (Buddy4Study) द्वारे डॉ. राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम २०२६-२७ ची घोषणा करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच १०वी किंवा १२वी ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी थेट ३०,००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. चला तर मग, या स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तर जाणून घेऊया.

तपशील (Details)माहिती (Information)
योजनेचे नावडॉ. राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम २०२६-२७
आयोजकBuddy4Study
पात्रता१०वी किंवा १२वी उत्तीर्ण (शैक्षणिक वर्ष २०२५-२६)
आवश्यक टक्केवारीमागील परीक्षेत किमान ६५% गुण
उत्पन्न मर्यादाकौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा जास्त नसावे
स्कॉलरशिप रक्कम₹३०,००० पर्यंत (वन-टाईम)
अर्ज करण्याची पद्धतफक्त ऑनलाईन (Online)
शेवटची तारीख२८ जून २०२६
अप्लाय लिंकयेथे अर्ज करा

पात्रतेचे निकष (Eligibility Criteria)

या स्कॉलरशिपसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे,

  • शिक्षण: विद्यार्थ्याने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात १० वी किंवा १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • गुण: मागील इयत्तेत (१०वी/१२वी) विद्यार्थ्याला किमान ६५% गुण असणे अनिवार्य आहे.
  • उत्पन्न मर्यादा: विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • ही योजना भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

विशेष प्राधान्य (Preference) कोणाला मिळेल?

जर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गात येत असाल, तर तुम्हाला या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाईल:

  • सरकारी शाळांमधून शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी.
  • दिव्यांग (PwD) विद्यार्थी.
  • ईशान्येकडील राज्ये (North-East) आणि आकांक्षित जिल्ह्यांमधील विद्यार्थी.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Important Documents)

ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा,

  • आधार कार्ड (ओळखपत्र)
  • मागील वर्षाची (१०वी/१२वी) गुणपत्रिका (Marksheet)
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  • चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशाचा पुरावा (उदा. बोनाफाईड सर्टिफिकेट, फी पावती किंवा ओळखपत्र)
  • बँक पासबुकची प्रत (बँक तपशीलासाठी)
  • पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया (SOPs)

या स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अप्लाय करण्याच्या SOPs खालीलप्रमाणे आहेत. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा अर्ज मोबाईल किंवा लॅपटॉपवरून सहज भरू शकता,

१. सर्वात प्रथम खाली दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करा.
२. Buddy4Study च्या वेबसाईटवर तुमची नोंदणी (Registration) करा. तुम्ही तुमच्या Gmail अकाउंटचा वापर करून सहज लॉगिन करू शकता.
३. लॉगिन झाल्यानंतर, ‘Dr. Rajendra Prasad Scholarship Program 2026-27’ च्या पेजवर जाऊन ‘Start Application’ बटण दाबा.
४. अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक खात्याची माहिती अचूक भरा.
५. वर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईझमध्ये अपलोड करा.
६. अर्जातील सर्व माहिती एकदा तपासून घ्या आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)क्लिक करा (Click Here)
ऑनलाईन अर्ज लिंक (Apply Online)Apply Now
स्कॉलरशिप QR कोड (QR Code)View QR
अधिकृत वेबसाईट (Official Website)Website

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment