मर्चेंट नेव्ही जॉईन कशी करायची ? : how to join merchant navy ?

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

how to join merchant navy : दहावी आणि बारावीचा एक टप्पा पार केला की विद्यार्थी तसेच पालकांना वेध लागतात ते मुलांच्या भविष्याचे. असंख्य प्रश्न पालकांच्या मनात निर्माण होतात. जसे की आपल्या मुलाने कोणते क्षेत्र निवडावे, काय शिकावे, मार्गदर्शन कुणाचे घ्यावे, कॉलेज कोणते निवडावे असे अनेक न संपणारे प्रश्न पालकांच्या मनात गोंगावत असतात. विद्यार्थी मात्र आपल्या मित्राने निवडलेले क्षेत्र निवडण्याला प्राधान्य देतात. सर्वच विद्यार्थी असे करत नाहीत, पण 50 ते 60 टक्के विद्यार्थी अपुऱ्या मार्गदर्शनामुळे मित्र निवडतो तेच क्षेत्र निवडतात.

काही मुले यशस्वी होतात, तर काही मुलांना पश्चाताप सुद्धा होतो. कारण निर्णय चुकलेला असतो. हीच गोष्ट आपण जर विचार करुन आणि मार्गदर्शन घेऊन केली तर पश्चाताप होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केला आहे. त्यामुळेच एका अशा करिअर पर्यायाबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणरा आहोत.

भारतीय नौदलाबद्दल आपल्या सर्वांना माहित असेल पण मर्चंट नेव्ही (Merchant Navy) म्हंटले की बऱ्याच जणांना याची माहिती नसते किंवा मर्चंट नेव्ही म्हणजे भारतीय नौदलाचा एक भाग त्यांना वाटतो. पण तसे अजिबात नाही. भारतीय नौदल आणि मर्चंट नेव्ही या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मर्चंट नेव्हीची (Merchant Navy) संपूर्ण माहिती विद्यार्थी आणि पालकांनी तसेच सर्वांनी आवर्जून वाचावी. ज्या विद्यार्थ्यांना प्रवास आणि साहसाची आवड आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी मर्चंट नेव्हीचे क्षेत्र लाभदायक आहे.

मर्चंट नेव्ही म्हणजे काय / What Is Merchant Navy

ज्या विद्यार्थ्यांना प्रवासाची, नवनवीन ठिकाणांना भेट देण्याची आवड आहे. अशा विद्यार्थ्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये करिअर घडवण्याच्या दृष्टीने नक्कीच विचार करायाला हवा. मर्चंट नेव्हीचे नाव तुम्हाला भारतीय नौदलासारखे वाटेल, पण तसे अजिबात नाही. मर्चंट नेव्ही हा भारतीय नौदलाचा भाग नाही. मर्चंट नेव्ही हे एक स्वतंत्र व्यावयायिक क्षेत्र आहे. सागरी जहाजांद्वारे माल तसेच प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारे क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्ही. सरकारी आणि खासगी दोन्ही कंपन्या मर्चंट नेव्हीमध्ये काम करतात.

पूर्ण जगाचा विचार केला तर जगातील एकूण व्यापारापैकी 85 टक्केहून अधिक व्यपार हा सागरी मार्गाने होतो. जवळपास 50 हजार पेक्षा जास्त जहाजे ही मर्चंट (Merchant) या प्रकरात मोडतात. त्यामुळे मर्चंट नेव्हीची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मालवाहतुकीचा विचार केला तर जलवाहतुक हा जगातील सर्वात स्वस्त मार्ग आहे. त्यामुळे भविष्यात या व्यावसायामध्ये अमुलाग्र आणि आधुनिक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मर्चंट नेव्हीसाठी शैक्षणिक पात्रता / Merchant Navy Qualification

मर्चंट नेव्ही म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. आता आपण मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहू. मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा पदवी पूर्ण केलेली असावी. म्हणजेत 10वी पास ते बी.टेक पदवी असलेल्यांसाठी या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने कोर्सेस उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्ही जर मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पदवीमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण असले पाहिजेत. तसेच तुमचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मर्चंट नेव्हीमध्ये सामील होण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे तुम्ही अविवाहीत असणे आवश्यक आहे.

🛑 Join WhatsApp Group: Join Now

मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेण्यासाठी काय करावे? / How To Join Merchant Navy

मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचे वय हे 16 ते 25 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. तसेच तुम्ही अविवाहीत असणं सुद्धा पात्रतेच्या दृष्टीने गरजेचे आहे. दहावी, बारावी आणि पदवी पूर्ण केल्यानंतर कोणकोणते कोर्सेस तुमची वाट पाहत आहेत. ते आपण थोडक्यात पाहू. तुम्ही जर आता 10वी ला असाल आणि मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याच्या तयारीत असाल तर त्यासाठी पुढील कोर्स तुमच्यासाठी महत्वाचे आहे. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी नौदलात कार्मिकांसाठी प्री-सी ट्रेनिंग, डेक रेटिंग सलून रेटिंग तसेच इंजिन रेटिंग यांसारख्या विषायांमध्ये डिप्लोमा करू शकतो.

how to join merchant navy after 12th – 12वी विज्ञान शाखेतून तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर, तुम्ही नॉटीकल सायन्स, मरीन इंजिनीअरिंग, ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनिअर्स हे कोर्स करू शकता.

तुमची पदवी पूर्ण झाली आहे. आता तुम्हाला मर्चंट नेव्हीचे वेध लागले आहेत. तर सर्वाता महत्वाचा निकष म्हणजे तुम्ही पदवी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच तुमचे वय हे 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि तुम्ही अविवाहीत असणे गरजेचे आहे.

मर्चंट नेव्हीमध्ये अॅडमीशन घेण्यासाठी कोणती परिक्षा द्यावी लागते / Merchant Navy Exam / Merchant Navy Admission

10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मर्चंट नेव्ही जॉईन करण्यासाठी पूढील टप्पे महत्वाचे आहेत. (how to join merchant navy after 10th)

 10वी पूर्ण केल्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये सामील होण्यासाठी, विद्यार्थ्याने 40 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी. त्यानंतर स्क्रिनिंग चाचणी आणि लेखी परिक्षा देणे गरजेचे असते.
 आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असले. 10वी नंतर अभ्यासक्रम कोणता करावा तर त्यासाठी पुढे देण्यात आलेले कोर्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. 1) डेक रेटिंग कोर्स 2) इंजिन रेटिंग कोर्स 3) NCV अभ्यासक्रम 4) सगारी अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा 5) सलून रेटिंग कोर्स 6) जीपी रेटिंग कोर्स

12वी उत्तीर्ण झाल्यानंतर मर्चंट नेव्ही जॉईन करण्यासाठी पुढील टप्पे महत्वाचे आहेत (how to join merchant navy after 12th)

 विद्यार्थ्याने 12वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी.
 विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असले पाहिजे.
 मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुढील प्रवेश परिक्षा घेतल्या जातात
a) Indian Maritime University Common Entrance Test (IMU CET)
b) JEE Advanced
c) All India Merchant Navy Entrance Test (AIMNET)
 प्रवेश परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने पूढचा महत्वपूर्ण प्रवास सुरू होतो.

मर्चंट नेव्हीचा कोर्स (merchant navy courses)

10वी आणि 12वी पूर्ण झाल्यानंतर कशापद्धतीने अभ्यासक्रम आणि कोर्सेस आहेत, याची माहिती तुम्हाला मिळाली आहे. आता पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढील कोर्स तुम्ही करू शकता.

 पदव्युत्तर मर्चंट नेव्ही अभ्यासक्रम 1) Master’s in Logistics And Supply Chain Management 2) Master’s in Naval Architecture Ocean Engineering 3) Master’s Maritime Management 4) Master’s In Port Management.
 प्रोफेशनल सर्टिफिकेट अभ्यासक्रम 1)Chartered Institute Of Logistics And Transport (CILT) qualification 2) Chartered Shipbrokers (ICS) 3) Certification in Maritime Law 4) Certified Marine Surveyor

लोकप्रीय मर्चंट नेव्ही कोर्स / Merchant Navy Course

Bachelor Of Technology (B Tech) (4 Years)

  • B Tech Marine Engineering
  • B Tech Naval Architecture and Offshore Engineering
  • B Tech Ship Building
  • B Tech Harbor & Ocean Engineering

Bachelor Of Engineering (BE) (4 Years)

  • BE Mechanical Engineering
  • BE Harbor and Ocean Engineering
  • BE Marine Engineering
  • BE Petroleum Engineering

Master Of Business Administration (MBA) (2 Years)

  • MBA Shipping & Logistics Management
  • MBA Shipping Finance

Bachelor Of Business Administration (BBA) (3 Years)

  • B.B.A Logistics & Supply Chain Management
  • BBA Shipping

Diploma Courses

  • Diploma In Marine Engineering (DME) (2 Years)
  • Diploma In Nautical Science (DNS) (1 Year)
  • Higher National Diploma (Marine Engineering) (2 Years)
  • Higher National Diploma (Nautical Science) (2 Years)

इतर अभ्यासक्रम

  • Marine Engineering Under Alternate Training Scheme (2 Years 6 Months)
  • B.SC Nautical Science (3 Years)
  • Graduate In Marine Engineering GME (1 Year)
  • G.P Rating (6 Months)
  • Electro-Technical Officer Course (4 Months)
  • Commercial Diving (2 Months)
  • Direct Entry Scheme (3 Months)
  • Saloon Rating (6 Months)

मर्चंट नेव्हीमध्ये सामील होण्यासाठी पात्रता निकष काय आहेत याची सविस्तर माहिती. / Merchant Navy Eligibility Criteria

12वी उत्तीर्ण विद्यार्थी जे आता बॅचलर पदवीला आहेत त्यांच्यासाठी पात्रता निकष

  • सर्वात महत्वाचा निकष म्हणजे विद्यार्थ्याने 12वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • 12वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे अनिवार्य विषय असले पाहिजेत.
  • विद्यार्थ्याचे वय 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे

पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यासाठी पात्रता निकष

  • Graduate Marine Engineering (GME)ला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर, उमेदवाराने नेव्हल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये BE पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • ज्या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्हीमध्ये एमबीए (MBA) करायचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • GME तसेच MBA करण्यासाठी लागणारी कमाल वयोमर्यादा 25 ते 28 वर्षे आहे.

6 महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी पात्रता

  • या अभ्यासक्रमासाठी विज्ञान, गणित आणि इंग्रजी या विषयांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्याने 40 टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण केलेली असावी.
  • विद्यार्थ्याचे वय 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.

एक वर्षांच्या आणि दोन वर्षांच्या डिप्लोमा कोर्ससाठी पात्रता निकष

  • एक वर्षांचा डिप्लोमा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याने 12वी परिक्षा PCM आणि इंग्रजीसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा शिपबिल्डिंग इंजिनीअरिंगमध्ये किमाव 50 टक्के गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
  • विद्यार्थ्याचे वय हे 25 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.

विविध प्रकारचे करिअर:

मर्चेंट नेव्हीमध्ये तुम्ही डेक ऑफिसर, इंजिनियरिंग ऑफिसर किंवा रेटिंग म्हणून काम करू शकता.
तुम्ही catering, electrical आणि purser यांसारख्या इतर विभागांमध्येही काम करू शकता.

मर्चंट नेव्ही बद्दल तुमच्या मनात असणाऱ्या शंका दुर करण्याचा प्रयत्न या लेखामध्ये करण्यात आला आहे. 

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा