How to Join Merchant Navy Marathi: मर्चंट नेव्ही ही एक व्यावसायिक नौदल सेवा आहे जी मुख्यतः आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी असते. ही सेवा आयात-निर्यातीच्या कामासाठी आहे त्यामध्ये डेक ऑफिसर्स, इंजिनिअर्स, किचन स्टाफ, आणि कॅप्टन्स यां विविध पदांचा समावेश असतो. जर तुम्हाला समुद्रावर adventurous जीवनशैली हवी असेल, तर मर्चंट नेव्ही तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
पण नक्की Merchant Navy काय असतं? कसा प्रवेश मिळतो? कोणते कोर्सेस करावे लागतात? Merchant Navy Eligibility आणि पगार किती मिळतो? हे सर्व आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत.
मर्चंट नेव्ही म्हणजे काय?
What is Merchant Navy in Marathi?
मर्चंट नेव्ही ही एक व्यावसायिक नौदल सेवा आहे म्हणजेच नागरी (Non-Defense) शाखा आहे जी मुख्यतः आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी असते. ही सेवा आयात-निर्यातीच्या कामासाठी प्रामुख्याने चालवली जाते आणि यामध्ये डेक ऑफिसर्स, इंजिनिअर्स, किचन स्टाफ, आणि कॅप्टन्स यांचा समावेश असतो.
Merchant Navy एक अशी नोकरी आहे ज्यात तुम्हाला समुद्रावर प्रवास, जगातील वेगवेगळ्या देशांत जाण्याची संधी, आणि टॅक्स-फ्री वेतन देते. त्याचबरोबर ही करिअर अत्यंत प्रोफेशनल आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर पर्याय आहे.
मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता (Merchant Navy Eligibility)
Requirements (पात्रता) | |
वय | किमान 17 वर्षे |
शैक्षणिक पात्रता | 10+2 (PCM) किमान 60% गुणांसह |
इंग्रजी विषयात गुण | किमान 50% (10वी व 12वी) |
वैद्यकीय पात्रता | D.G. Shipping द्वारे मान्य डॉक्टरकडून फिटनेस आवश्यक |
दृष्टिक्षमतेची आवश्यकता | 6/6 (Eye Sight) & No Color Blindness |
मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुख्य कोर्सेस (Merchant Navy Courses)
कोर्स नाव | कालावधी | पात्रता | Post |
DNS (Diploma in Nautical Science) | 1 वर्ष | 12वी (PCM) | Deck Officer बनण्यासाठी |
B.Sc Nautical Science | 3 वर्षे | 12वी (PCM) | Navigation Officer बनण्यासाठी |
Marine Engineering | 4 वर्षे | 12वी (PCM) | Engine Department Officer बनण्यासाठी |
G.P. Rating | 6 महिने | 10वी पास | Deck & Engine crew साठी |
Merchant Navy Courses Details
1. DNS (Diploma in Nautical Science)
- कोर्स कालावधी: 1 वर्ष
- पात्रता: 12वी (PCM), IMU CET पात्रता
- नोकरी: Deck Cadet → 3rd Officer → Captain
2. B.Sc Nautical Science
- कोर्स कालावधी: 3 वर्षे
- पात्रता: 12वी (PCM), IMU CET
- फायदे: थेट Deck Officer पदासाठी तयारी
3. B.Tech in Marine Engineering
- कोर्स कालावधी: 4 वर्षे
- पात्रता: 12वी (PCM), IMU CET
- नोकरी: Trainee Marine Engineer → Chief Engineer
4. G.P. Rating Course
- कोर्स कालावधी: 6 महिने
- पात्रता: 10वी पास, किमान 40% गुण
- नोकरी: Deck/Engine Crew, Cook, Motorman
5. ETO (Electro Technical Officer) Course
- कोर्स कालावधी: 4-6 महिने
- पात्रता: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री
How to Join Merchant Navy Marathi प्रवेश प्रक्रिया

Merchant Navy Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रता Education Qualification
सर्वप्रथम तुम्ही 12वी सायन्स शाखेतून (Physics, Chemistry, Maths) पास असणे आवश्यक आहे यासोबतच इंग्रजी विषयातही किमान 50% गुण 10वी/12वी मध्ये लागतात.
Entrance Exams
IMU CET (Indian Maritime University Common Entrance Test) देणे आवश्यक आहे खासकरून DNS, B.Sc Nautical Science, B.Tech in Marine Engineering कोर्सेस साठी
काही कंपनी स्वतः Sponsored Exams घेतात यामध्ये DNS किंवा Marine Engineering साठी परीक्षा घेतली जाते खासकरून TMI, Anglo Eastern, Great Eastern हे कॉलेज Sponsored Exams घेतात
Medical Test & Eye Test
DG Shipping मान्य डॉक्टरकडून फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक. यामध्ये Color blindness चालत नाही, Perfect Vision (6/6) आवश्यक, सायकॉलॉजिकल आणि फिटनेस टेस्ट घेतली जाते
Course Admission आणि Training
प्रवेश परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर संबंधित कोर्ससाठी प्रवेश घेऊन ट्रेनिंग करावे लागते.
Onboard Training (Sea Time)
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 6 महिने ते 1 वर्ष actual जहाजावर काम करण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते.
भारतातील टॉप Merchant Navy प्रशिक्षण संस्था
संस्था नाव | Location |
Tolani Maritime Institute | पुणे |
Anglo Eastern Maritime Academy | कर्जत |
Great Eastern Institute of Maritime Studies | लोनावळा |
Samundra Institute of Maritime Studies | लवासा |
Indian Maritime University (IMU) | चेन्नई, कोची, मुंबई |
Note: केवळ DG Shipping आणि IMU मान्यताप्राप्त संस्थांकडूनच कोर्स करावा.
Merchant Navy मधील पदांची माहिती
पद | Working |
Deck Cadet | नेव्हिगेशन, डायरी अपडेटिंग, सिग्नलिंग |
3rd Officer | सुरक्षा, लाईफ बोट तपासणी |
2nd Officer | नेव्हिगेशन चार्ट आणि रूटिंग |
Chief Officer | मालाचे लोडिंग व अनलोडिंग, देखरेख |
Captain | संपूर्ण जहाजाची जबाबदारी |
Marine Engineer | इंजिन्स आणि मशिन्सची देखरेख |
Electrical Officer | इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि कंट्रोल |
GP Rating | बेसिक जहाज कामे (Deck/Engine सहायक) |
Merchan Navy Salary: पगाराची माहिती
Merchant Navy मध्ये पगार पद आणि अनुभवावर अवलंबून असतो.
पद (Post) | पगार (Salary) |
Deck Cadet | ₹25,000 – ₹50,000 / महिना |
3rd Officer / Junior Engineer | ₹1.2 लाख – ₹2 लाख / महिना |
Chief Officer / 2nd Engineer | ₹3 लाख – ₹5 लाख / महिना |
Captain / Chief Engineer | ₹5 लाख – ₹10 लाख+ (Tax-Free) |
Merchant Navy ची फायदे व तोटे
फायदे | तोटे |
आकर्षक पगार (Tax-Free) | कुटुंबापासून दूर |
जग फिरण्याची संधी | 6 ते 9 महिने समुद्रावर |
कमी वयात जास्त उत्पन्न | सुरक्षेच्या जोखमी |
नोकरीसाठी उच्च मागणी | वैद्यकीय अडचणी (Motion Sickness) |
Final Words
Merchant Navy ही एक जागतिक दर्जाची सर्वोत्तम करिअर संधी आहे यामध्ये तुम्हाला प्रवास, आकर्षक पगार, आणि मान सन्मान मिळतो. जर तुम्ही Science मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी असाल यासोबतच adventurous life-style जगण्यास तयार असाल, तर Merchant Navy तुमच्यासाठी योग्य क्षेत्र आहे.
तुम्हाला How to Join Merchant Navy Marathi पोस्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला अजून माहिती हवी असल्यास किंवा कोर्स व कंपनीसाठी मार्गदर्शन हवे असल्यास खाली कमेंट करा व आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
10वी नंतर How to Join Merchant Navy Marathi मध्ये जाता येईल का?
होय, GP Rating कोर्सद्वारे.
चष्मा लावणाऱ्यांना प्रवेश मिळतो का?
नाही, Vision 6/6 असावी लागते.
मुली Merchant Navy मध्ये जाऊ शकतात का?
हो, अगदी Captains सुद्धा आहेत.
पगार किती आणि केव्हा मिळतो?
पगार कामाच्या पदावर आणि अनुभवावर अवलंबून. अनेकदा डॉलरमध्ये मिळतो.
Source: DG Shipping
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..