स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

Maharashtra TET 2025 : टीईटी अर्जाची अंतिम तारीख ९ ऑक्टोबरपर्यंत वाढवली

Date:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 ही येत्या २३ नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. राज्यातील लाखो उमेदवार या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज करत असतात. सुरुवातीला या परीक्षेच्या अर्जासाठी १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर 2025 असा कालावधी ठरवण्यात आला होता. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक परीक्षार्थी वेळेत अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने उमेदवारांच्या सोयीसाठी अर्ज भरण्याची नवीन अंतिम तारीख ९ ऑक्टोबर 2025 (गुरुवार) पर्यंत वाढवली आहे.

परीक्षार्थीना ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी तसेच शुल्क भरण्यात समस्या आल्याची नोंद झाली होती. त्यामुळे आता उमेदवारांना नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड याद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सोय करण्यात आली आहे. शुल्क भरण्याची अंतिम मुदत देखील ९ ऑक्टोबर 2025 रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

ही परीक्षा शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रता सिद्ध करणारी महत्त्वाची परीक्षा असल्यामुळे उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. प्राथमिक (Paper-I) आणि माध्यमिक (Paper-II) स्तरासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप, वेळापत्रक आणि प्रवेशपत्र याबाबतची पुढील माहिती उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरावा आणि परीक्षा शुल्क वेळेत जमा करावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment