Maharashtra Forest Guard Selection Process Vanrakshak Bharti:
Vanrakshak Bharti Selection Process: महाराष्ट्र वन विभागाच्या वनरक्षक भरती 2025 मध्ये सहभागी किंवा इच्छुक उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये घेतली जाते आणि प्रत्येक टप्पा पार करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी असते? शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, गुण, मेडिकल आणि अंतिम निवड याची सविस्तर माहिती Van Vibhag Bharti Selection Steps आपण या पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत.
वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025
महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक भरती (Vanrakshak Bharti) 2025 साठी उमेदवारांची निवड चार मुख्य टप्प्यांद्वारे केली जाणार आहे:
- लेखी परीक्षा (Written Test)
- कागदपत्र पडताळणी (Document Verification)
- शारीरिक चाचणी (Physical Test)
- अंतिम निवड (Final Selection)
Vanarakshak Bharti Selection Process
1. वनरक्षक भरती लेखी परीक्षा (Vanrakshak Bharti Written Test)
वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (CBT Test) द्वारे घेण्यात येईल. त्यासाठी खालील विषय, मार्कस असेल
Vanrakshak Written Exam Pattern
विषयाचे नाव | प्रश्नसंख्या | गुण |
सामान्य ज्ञान | 15 | 30 |
बुद्धिमत्ता चाचणी | 15 | 30 |
मराठी | 15 | 30 |
English | 15 | 30 |
एकूण | 60 | 120 |
Note: पात्रता किमान 40% गुण आवश्यक, परीक्षेचे स्वरूप MCQ प्रश्न, Online CBT Test, निगेटिव्ह मार्किंग नाही.
2. कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
Vanrakshak Bharti Selection Process Phase 2: वनरक्षक भरती प्रक्रिया 2025: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी होईल (DV) आणि खालील कागदपत्रे असणे आवश्यक असतील
- शैक्षणिक प्रमाणपत्र (१२वी किंवा समकक्ष)
- ओळखपत्र (Aadhar/PAN/Passport)
- जात प्रमाणपत्र (जर लागू असेल)
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- नोकरीस पात्रतेसाठी लागणारी इतर कागदपत्रे
Note: जर कोणत्याही उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे नसतील, तर त्याची निवड रद्द केली जाऊ शकते.
3. शारीरिक चाचणी (Physical Test)
कागदपत्रे पडताळणीनंतर झाल्यानंतर लगेच पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. यामध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता, उंची, वजन, छाती यांची तपासणी होईल.
शारीरिक चाचणी Physical Test Details
पुरुष Candidate:
- Running: 5 Km (17 मिनिटे) किंवा नियमांनुसार
- उंची: किमान 163 सेमी
- छाती: 79 सेमी (फुगवून 84 सेमी)
- लांब उडी (Long Jump) किमान 4 मीटर
महिला Candidate:
- Running: 3 Km (12 मिनिटे) किंवा नियमांनुसार
- उंची: किमान 150 सेमी
- लांब उडी (Long Jump) किमान 3 मीटर
Note: शारीरिक चाचणीसाठी एकूण 80 गुण आहेत.
4. अंतिम निवड व गुणवत्ता यादी (Vanarakshak Final Selection & Merit List)
वनरक्षक भरतीमध्ये लेखी परीक्षा (120 गुण) व शारीरिक चाचणी (80 गुण) या दोन्ही टप्प्यांतील गुण एकत्र करून Final Merit List तयार केली जाईल.
Merit Base Selection: ज्यांचे एकूण गुण सर्वाधिक असतील, त्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी पात्र ठरवले जाईल.
निवड प्रक्रियेचा सारांश (Vanrakshak Bharti Selection Process Summery)

Van Vibhag Bharti Selection Steps
टप्पा | तपशील | गुण / पात्रता |
1. लेखी परीक्षा | CBT Online Test | 120 गुण (40% आवश्यक) |
2. Document Verification | कागदपत्र तपासणी | पात्र / अपात्र |
3. शारीरिक चाचणी | धावणे, उंची, छाती इ. | 80 गुण |
4. अंतिम निवड | Final Merit List + Offer Letter | एकूण गुणांवर आधारित |
Vanrakshak Bharti Selection Process वनरक्षक भरती 2025 ही निसर्ग व पर्यावरण सेवेसाठी उत्कृष्ट संधी आहे. यामार्फत तुम्हाला सरकारी नोकरी ची उत्तम संधी मिळते. यामध्ये लेखी परीक्षा, डॉक्युमेंट, शारीरिक चाचणी व गुणांवर आधारित अंतिम निवड अशा चार टप्प्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड होते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Vanrakshak Bharti मुलाखत असते का?
नाही, या भरती प्रक्रियेत कोणतीही मुलाखत घेतली जात नाही.
लेखी परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे का?
नाही, वनरक्षक परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही.
शारीरिक चाचणीमध्ये गुण दिले जातात का?
होय, Physical Test ला 80 गुण निश्चित करण्यात आले आहेत.
Source: https://mahaforest.gov.in/
तुम्हाला अजून Vanrakshak Bharti संदर्भात विचारायचे असल्यास, खाली कमेंट करा किंवा आमच्या वेबसाईटवर नियमित भेट द्या!
Hya..,Post La fakt 12th,science pahije ka or dusr pn streem chalte