MPSC PSI Syllabus and Exam Pattern 2024: MPSC PSI अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2024

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MPSC PSI Syllabus and Exam Pattern 2024 : एमपीएससी पीएसआय भर्ती 2024 साठी बसलेल्या उमेदवारांनी परीक्षेची तयारी आधीच करायला हवी. चांगली तयारी करण्यासाठी, हे महत्वाचे आहे की इच्छुकांना MPSC PSI अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीची माहिती असणे आवश्यक आहे. या लेखातून, तुम्हाला परीक्षेच्या तारखेकडे जाण्यापूर्वी अभ्यासक्रम, परीक्षेचा नमुना, परीक्षेची चांगली तयारी करण्याच्या टिप्स आणि बऱ्याच गोष्टी मिळतील.

एकूण निवड प्रक्रियेमध्ये प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक मानक चाचणी आणि मुलाखत असेल. प्रिलिम्स परीक्षा १०० गुणांची आणि मुख्य परीक्षा ४०० गुणांची असणे अपेक्षित आहे. 2024 चा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप सारखेच असण्याची शक्यता आहे. 2024 सायकलच्या निवड प्रक्रियेतील कोणतेही बदल औपचारिक अधिसूचनेत अद्यतनित केले जातील.

MPSC PSI Syllabus 2024 (Expected)

महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत MPSC PSI पदांच्या भरतीसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेत विचारले जाणारे सर्व-महत्त्वाचे विषय येथे आहेत. कृपया दिलेल्या तपशीलांचा संदर्भ घ्या आणि प्रकरणानुसार एमपीएससी पीएसआय अभ्यासक्रम काळजीपूर्वक पहा. 2024 सायकलचा अभ्यासक्रम बदलल्यास, तो येथे अपडेट केला जाईल!

भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम – जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.

पेपर २ (स्वतंत्र पेपर) – २०० गुण

१) बुद्धिमत्ता चाचणी

२) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical)भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiography) विभाग, हवामान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल  – लोकसंख्या व त्यांचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

३) महाराष्ट्राचा इतिहास –  सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वांच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती तील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.

४) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावना मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे /ठळक वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

५) मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्य घटनेतील तरतुदी, भारतातील मानवी हक्क व जवाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी,(हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगार, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

६) महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ (Maharashtra Police Act)

७) भारतीय दंड संहिता, १८६० (Indian penal code)

८) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ( Criminal Procedure Code)

९)  भारतीय पुरावा अधिनियम १८७२ (Indian Evidence Act.)

STI Syllabus 2021 | mpsc sti syllabus

PSI मुलाखत

मुख्य परीक्षेनंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत घेतले जाते. या मुलाखतीमध्ये शारीरिक चाचणी अंतर्भूत असते. निवडीच्या अंतिम टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा व मुलाखत यातील मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.

पी.एस.आय. पदासाठी मुलाखत 40 गुणांची असते.  मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतरच उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतो व त्याची मुलाखत घेतली जाते.

PSI Exam related Guidance : पीएसआय व्हायचंय? पात्रत, वाचा परीक्षेपासून पोस्टिंग पर्यंत सविस्तर माहिती…

PSI शारीरिक चाचणी – एकूण गुण १०० 

पुरुषांसाठी 

१) गोळाफेक (वजन ७.२६० किलो) – अंतर ७.५० केल्यास १५ गुण 

२) पुल अप्स (८ पुल अप्स प्रत्येकी २.५ गुण एकूण २० गुण 

३) लांब उडी ४.५० मी. एकूण गुण १५ गुण 

४) धावणे ८०० मी. वेळ २ मिनिटे ३० सेकंद ५० गुण 

एकूण १०० गुण 

महिलांसाठी 

१) गोळाफेक (वजन ४ कि. ग्रॅ) अंतर ६ मी. २० गुण 

२) धावणे २०० मी. वेळ ३५ सेकंद ४० गुण 

३) चालणे ३ किमी. वेळ २३ मिनिटे ४० गुण 

एकूण १०० गुण 

मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ४०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत एकूण ५४० गुणांपैकी पीएसआय पदासाठी निवड केली जाते. 

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा