how to become psi in Maharashtra – महाराष्ट्रात PSI होण्यासाठी काय तयारी करावी लागते ?

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

how to become psi in Maharashtra : पोलिस खात्यात भरती होणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यातही ‘पीएसआय’ पदासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. PSI होण्यासाठी काय तयारी करावी लागते ? पण या पदापर्यंत नेमके पोहोचायचे कसे, कोणत्या परीक्षा, भरती कशी होते, वेतन किती असते याचे माहिती जाणून घेऊया..

सगळेच सरकारी नोकरी च्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये पीएसआय हे एक महत्त्वपूर्ण पद आहे. एमपीएससी आयोगाने म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडून पीएसआय पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी पीएसआय पदासाठी अर्ज करीत असतात.

परंतु आपल्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना पीएसआय म्हणजे काय? किंवा पीएसआय पदाबद्दल पुर्णता माहिती नसल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही PSI पदा बद्दल माहिती घेऊन आलोत. आम्हाला आशा आहे की, हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

PSI meaning in Marathi | पीएसआय म्हणजे काय ?

पीएसआय म्हणजे पोलिस उपनिरीक्षक. हे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील एक अधिकारी पद आहे. MPSC आयोगाकडून पीएसआय पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. Mpsc combined group B ही परीक्षा PSI, STI, ASO या पदांसाठी एकत्रित prelim exam घेऊन पीएसआय पदांसाठी योग्य पात्रता असलेल्या व्यक्तिची निवड करतात. याला मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा म्हटले जाते.

police bharti

पीएसआयची कामे:

• पोलीस स्टेशनचे व्यवस्थापन आणि देखरेख

• गुन्हेगारी तपास आणि गुन्हेगारांना पकडणे

• कायदा आणि सुव्यवस्था राखणे

• नागरिकांना मदत आणि सुरक्षा प्रदान करणे

• पोलीस कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व

पीएसआय बनण्यासाठी:

तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे आयोजित केलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.तुम्ही स्नातक असणे आवश्यक आहे. पीएसआय पदासाठी किमान वयोमर्यादा १९ वर्षे आहे तर कमाल मर्यादा ३१ वर्षे आहे. यामध्ये मागासवर्गीय, अनाथ, प्राविण्य प्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, यासारख्या आरक्षित संवर्गामध्ये वयोमर्यादेमध्ये सूट मिळते.

पीएसआयचे वेतन:

● पीएसआयचे वेतन ₹44,900 ते ₹1,44,200 पर्यंत असते.

● वेतन पद, अनुभव आणि शैक्षणिक पात्रता यावर अवलंबून असते.

पीएसआय पदासाठी शारीरिक पात्रता:

  1. पुरूष –

कमीत कमी उंची १६५ सेंटिमीटर (पायात कोणत्याही प्रकारचे चप्पल किंवा बूट न घालता) छाती न फुगविता ७९ सेंटीमीटर (फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर आवश्यक)

2. महिला –

कमीत कमी उंची १५७ सेंटीमीटर (पायात कोणत्याही प्रकारचे चप्पल किंवा बूट न घालता.)

पीएसआय परीक्षेचे टप्पे:

● संयुक्त पूर्व परीक्षा १०० गुण (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)

● मुख्य परीक्षा ४०० गुण (पेपर १ संयुक्त व पेपर २ स्वतंत्र)

● शारीरीक चाचणी १००

● गुणमुलाखत ४० गुण

पीएसआय परीक्षेचा अभ्यासक्रम:

प्राथमिक परीक्षा:

  • सामान्य ज्ञान: चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान आणि तंत्रज्ञान
  • मराठी भाषा: व्याकरण, शब्दसंग्रह, वाचन समज आणि लेखन
  • तर्कशास्त्र आणि गणित: गणितीय समस्या सोडवणे, तर्क आणि तर्क
  • इंग्रजी भाषा: व्याकरण, शब्दसंग्रह, वाचन समज आणि लेखन

मुख्य परीक्षा:

  • सामान्य ज्ञान:
  • भारत आणि जगाचा इतिहास
  • भारतीय राज्यघटना आणि राजकारण
  • अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान
  • चालू घडामोडी
  • मराठी भाषा:
  • व्याकरण
  • शब्दसंग्रह
  • वाचन समज
  • लेखन
  • निबंध
  • इंग्रजी भाषा:
  • व्याकरण
  • शब्दसंग्रह
  • वाचन समज
  • लेखन
  • निबंध
  • अभ्यासक्रम आणि कायदा:
  • भारतीय दंड संहिता (IPC)
  • भारतीय दंड प्रक्रिया संहिता (CrPC)
  • महाराष्ट्र पोलीस कायदा
  • इतर संबंधित कायदे
  • मनोविज्ञान:
  • सामान्य मनोविज्ञान
  • सामाजिक मनोविज्ञान
  • अपराधी मनोविज्ञान
  • व्यक्तिमत्व विकास:
  • नेतृत्व
  • संवाद कौशल्य
  • निर्णय घेणे
  • समस्या सोडवणे
  • शारीरिक क्षमता:
  • धावणे
  • उडी मारणे
  • पुश-अप्स
  • सिट-अप्स

अभ्यास साहित्य:

  • MPSC द्वारे प्रकाशित अभ्यासक्रम आणि मार्गदर्शक तत्त्वे
  • मराठी आणि इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्रे आणि नियतकालिके
  • सामान्य ज्ञान आणि कायद्यावरील पुस्तके
  • MPSC परीक्षांच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका

तयारी टिपा:

  • अभ्यासक्रमाचे काळजीपूर्वक वाचन करा.
  • एक चांगला अभ्यास वेळापत्रक तयार करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा.
  • NCERT पुस्तके आणि इतर मानक संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करा.
  • मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवून सराव करा.
  • चालू घडामोडींबाबत अद्ययावत रहा.
  • तुमची शारीरिक क्षमता सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करा.
  • आत्मविश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा.

शारीरिक चाचणी (गुण – १००) :

पुरुषांसाठी

● गोळाफेक (वजन ७.२६० किलो) – अंतर ७.५० मी. केल्यास १५ गुण

● पुल अप्स (८ पुल अप्स) – प्रत्येकी २.५ गुण आणि एकूण २० गुण

● लांब उडी ४.५० मी. – एकूण १५ गुण

● धावणे ८०० मी. – वेळ २ मिनिटे ३० सेकंद – ५० गुण

महिलांसाठी

● गोळाफेक (वजन ४ कि. ग्रॅ) अंतर ६ मी. – २० गुण

● धावणे २०० मी. वेळ ३५ सेकंद – ४० गुण

● चालणे ३ किमी. वेळ २३ मिनिटे – ४० गुण

पीएसआय होण्यासाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ४०० गुणांच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. ती परीक्षा झाल्यानंतर १०० गुणांची शारीरिक चाचणी होते, ज्यामध्ये किमान ५० किंवा त्याहून अधिक गन अपेक्षित आहेत. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर ४० गुणांची मुलाखत होते. अशी पीएसआय पदासाठी उमेदवाराला ५४० गुणांची परीक्षा द्यावी लागते.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा