Table of Contents
Mukhyamantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे ज्याद्वारे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची” घोषणा करण्यात आली होती. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करावयाच्या असल्यास त्यादृष्टीने त्यांना धूरमुक्त स्वयंपाकाचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा राज्यातील 56 लाखाहून अधिक कुटुंबांना होणार आहे. अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
केंद्र सरकार उज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना एका गॅस सिलेंडर मागे ३०० रुपये अनुदान देते. एका गॅस सिलेंडरची सरासरी किंमत 830 रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपयेप्रमाणे तीन सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांनाही सरसकट अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे.
Mukhyamantri Annapurna Yojana
Yojana Name | Mukhyamantri Annapurna Yojana |
कोणी सुरू केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेचा उद्देश | गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर देणे |
लाभ | वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर |
लाभार्थी | राज्यातील महिला |
Who is Eligible For Mukhyamantri Annapurna Yojana मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्र आहे
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- महिलेच्या नावाने कुटुंबातील गॅस जोडणी असावी.
- कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
- महिला उज्वला योजना किंवा माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाव्यात.
- 14.2 Kg वजन असलेल्या गॅस सिलेंडर असेल तरच Mukhyamantri Annapurna Yojana चा लाभ मिळणार.
Benefits of Mukhyamantri Annapurna Yojana मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभ
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
- लाभार्थी महिला या महिन्याला केवळ एकच गॅस सिलेंडर घेऊ शकतात.
- वर्षातून घेतलेल्या तीन गॅस सिलेंडर वर शंभर टक्के सबसिडी दिली जाणार आहे.
Required Documents for Annapurna Yojana मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- अर्जदार महिलेचे पॅन कार्ड
- कुटुंबाचे रेशन कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- महिलेचा पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
Where to Apply For Mukhyamantri Annapurna Yojana मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कुठे अर्ज करावा
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी शासनाद्वारे अधिकृत पोर्टल सुरू केले जाणार आहे, अद्याप या योजनेसाठी कोणत्याही स्वरूपाची वेबसाईट अथवा पोर्टल किंवा मोबाईल ॲप सुरू केलेला नाहीये.
सध्याला आपले सरकार सेतू सुविधा केंद्र मध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करायचा आहे. सेतू केंद्र चालकाद्वारे तुमचा फॉर्म भरला जाईल, वर जे आवश्यक कागदपत्र सांगितले आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत आणि ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरून घ्यायचा आहे.