Table of Contents
Majhi Ladki Bahin Yojana List 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य पुरवले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या महिलांची यादी नियमितपणे जाहीर केली जाते. या लेखात आपण या लाभार्थी यादी कशी पाहू शकता याबद्दल सविस्तर माहिती आहे.
या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 83 महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे ?
लाडकी बहिण योजनेची यादी आता आजपासून जाहीर करणे सुरु झाले आहे, धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांची यादी पण जाहीर होणार आहे.
👉धुळे जिल्ह्याची लाभार्थी यादी येथून पहा👈
Majhi Ladki Bahin Yojana List 2024 Step by step guide
- सुरुवातीला तुम्हाला लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जायचे आहे.
- तेथे तुम्हाला “Provisional List” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि Captcha टाकायचा आहे, आणि “Receive OTP” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- OTP आल्यावर OTP टाकायचा आहे, नंतर “Verify OTP And Proceed” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर एक नवीन Window उघडेल तेथे तुम्हाला तुम्हाला सुरुवातीला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, नंतर तालुका निवडून तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- गाव निवडल्यानंतर तुमच्या गावाची Majhi Ladki Bahin Yojana List 2024 तुमच्या समोर प्रदर्शित होइल.
- आता तुम्हाला या लिस्ट मध्ये तुमचे नाव शोधायचे आहे, नाव जर तुम्हाला सापडले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, आणि नाव जर सापडले नाही तर तुमचा अर्ज त्रुटी मध्ये गेला आहे.
- त्रुटी मध्ये गेलेले अर्ज पुन्हा एकदा जिल्हा स्तरावर चेक करण्याची विनंती तुम्ही करू शकता. जर तुम्ही खरचं योजनेसाठी पात्र असाल तर तात्काळ तुमचे नाव लाभार्थी यादी मध्ये Add केले जाईल.
![Majhi Ladki Bahin Yojana List 2024](https://formwalaa.in/wp-content/uploads/2024/07/ladki-bahin-yojana-list-1-1-1024x553.png)
![](https://formwalaa.in/wp-content/uploads/2024/07/ladki-bahin-yojana-list-2-1.png)
![](https://formwalaa.in/wp-content/uploads/2024/07/ladki-bahin-yojana-list-3-1.png)
Use this process to download district wise list.
स्टेप 1 : तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याच्या शासकीय पोर्टलला भेट द्या.
स्टेप 2 : पोर्टल वर आल्यानंतर, “माझी लाडकी बहिण लाभार्थी यादी” या Option वर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्या जिल्ह्याची यादी तुमच्या समोर येईल.
स्टेप 4 : लाडकी बहिण योजना यादी हि वार्ड नुसार असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या वार्ड नुसार यादी चेक करावी लागणार आहे.
स्टेप 5 : एकदा का यादी प्रदर्शित झाली कि नंतर तुम्ही माझी लाडकी बहिण लाभार्थी यादी PDF स्वरुपात तुमच्या मोबाईल वर download करू शकता.
स्टेप 6 : यादी download झाली कि नंतर तुम्ही यादी मध्ये तुमचे नाव शोधू शकता.
ज्या वेळी ladki bahin yojana ची यादी PDF स्वरूपात Download पण केली कि तुम्ही Ladki bahin yojana List PDF Offline मध्ये पाहू शकता आणि लाभार्थी महिलांचे नाव पण चेक करू शकता.
![](https://formwalaa.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-29-at-3.32.51-PM.jpeg)
जर ऑनलाईन यादी पाहता आली नाहीतर कुठे पाहाल यादी?
१) पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या गावात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी पाहता येणार आहे.
२) प्रत्येक गावात समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत.
३) त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचना दरम्यान हजर राहावे लागणार आहे.
४) ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल, तर तोही करावा लागणार आहे.