PSI Exam related Guidance : पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) होण्याची इच्छा असणारे उमेदवारांसाठी ही माहिती खूपच उपयुक्त ठरेल. या लेखात आपण PSI परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
PSI होण्यासाठी कोणत्या पात्रता असणे आवश्यक आहे?
- शैक्षणिक पात्रता: बहुतेकदा पदवीधर असणे आवश्यक असते.
- वय: निश्चित वयोगट असतो जो जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केला जातो.
- शारीरिक पात्रता: उंची, वजन, छाती माप यांच्याबाबत निश्चित मापदंड असतात.
- राष्ट्रीयत्व: भारतीय नागरिक असणे आवश्यक.
PSI age limit in maharashtra:
पीएसआय भरतीसाठी असावी लागणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे:-
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे कमीत कमी वय 19 वर्ष व जास्तीत जास्त वय 31 वर्ष इतके असावे लागते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचे कमीत कमी वय 19 वर्षे तर जास्तीत जास्त वय 34 वर्षे इतके असावे लागते.
PSI selection process in maharashtra in marathi:
या भरतीसाठी असणारे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:-
१) पूर्व परीक्षा: ही परीक्षा एकूण शंभर गुणांची असते तसेच यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
२) मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतात. यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. तसेच दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी एक तासाचा अवधी मिळतो.
३) शारीरिक चाचणी: शारीरिक चाचणी ही शंभर गुणांची असते.
४) मुलाखत: ४० गुण
पीएसआय पदासाठी शारीरिक पात्रता: पुरूष -कमीत कमी उंची १६५ सेंटिमीटर (पायात कोणत्याही प्रकारचे चप्पल किंवा बूट न घालता)
छाती न फुगविता ७९ सेंटीमीटर (फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर आवश्यक)
महिला –
कमीत कमी उंची १५७ सेंटीमीटर (पायात कोणत्याही प्रकारचे चप्पल किंवा बूट न घालता.)
Mpsc PSI exam pattern
पीएसआय पदासाठी पूर्व व मुख्य अशा दोन लेखी परीक्षा घेतल्या जातात.
पीएसआय पूर्व परीक्षा:-
१) पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते.
२) यामध्ये general awareness या विषयावर शंभर प्रश्न विचारले जातात.
३) या परीक्षेसाठी एक तासाचा अवधी मिळतो.
४) यामधील प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
५) प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असतो.
पीएसआय मुख्य परीक्षा:
मुख्य परीक्षेसाठी शंभर मार्गाचे दोन पेपर असतात. प्रत्येक पेपरसाठी एक तासाचा अवधी मिळतो.
१) पेपर १:
पेपर 1 मध्ये साठी पुढील विषयांचा समावेश केला जातो
अ) मराठी: मराठी विषयावर 50 गुणांसाठी 50 प्रश्न विचारले जातात.
आ) इंग्रजी: इंग्रजी विषयावर 30 गुणांसाठी तीस प्रश्न विचारले जातात
इ) सामान्य ज्ञान: यामध्ये 20 गुणांसाठी 20 प्रश्न असतात.
२) पेपर 2:
सामान्य ज्ञान, ॲप्टीट्युड, मानसिक क्षमता ह्या विषयांवर शंभर गुणांसाठी शंभर प्रश्न विचारले जातात.
Maharashtra psi physical test details:
शारीरिक चाचणीमध्ये पुरुष व महिलांसाठी वेगळा आराखडा असतो. ही शारीरिक चाचणी ही शंभर गुणांची असते.
पुरुषांकरिता:
१) गोळा फेक: १५ गुण
२) पुलअप्स गुण: २० गुण
३) लांब उडी गुण: १५ गुण
४) धावणे (८०० मीटर): ५० गुण
महिलांकरिता:
१) गोळा फेक : २० गुण
२) धावणे (४०० मीटर): ५० गुण
३) लांब उडी: ३० गुण
महत्वाचे:
- ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. तपशीलवार माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत जाहिरातीचा संदर्भ घ्यावा.
- परीक्षेची पद्धती वेळोवेळी बदलू शकते.