पोलीस भरती बाबत मोठी बातमी – Police bharti 2024
सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ पदे १०० टक्के भरण्यास मंजुरी !पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. 100 टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे. राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे. राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे.
सविस्तर माहिती साठी GR डाउनलोड करा