स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔
Date:

मित्रांनो, ११वी प्रवेश प्रक्रियेत अजूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही आणि काही महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने विशेष फेरी जाहीर केली आहे. या फेरीत ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत नवीन कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीची संधी दिली असून, विद्यमान महाविद्यालयांना रिक्त जागा शासनाला समर्पित करायच्या आहेत. त्याच दिवशी दुपारी १:३० ते सायंकाळी ५ या वेळेत महाविद्यालयांना प्रवेश क्षमतेत वाढ करता येईल. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी ११ सप्टेंबर रात्री ८ पासून ते १२ सप्टेंबर सकाळी ९ पर्यंत खुली असेल.

यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या महाविद्यालयात जाऊन १२ सप्टेंबर दुपारी २ पासून ते १३ सप्टेंबर सायंकाळी ६ पर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. याआधी ‘ओपन टू ऑल’ फेरीत १४,४२२, सीएपी फेरीत १३,३२६ तर विविध कोट्यांतर्गत १,०९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या फेरीत विशेषतः राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून, अर्ज करताना दोन भाग असतील. भाग-१ मध्ये दुरुस्ती आणि भाग-२ मध्ये प्राधान्यक्रम (१ ते १० महाविद्यालये) निवडण्याची सुविधा असेल.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment