BMC Executive Assistant Exam Pattern And Syllabus |1846 जागांसाठी BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंट परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
BMC Executive Assistant Exam Pattern And Syllabus
BMC Executive Assistant Exam Pattern And Syllabus :The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has announced plans to conduct an online examination in August 2024 to fill 1,846 vacant Executive Assistant positions (formerly designated as Clerk). These positions will be filled through internal selection, allowing lower-level employees within the department to apply. To assist candidates in preparing for the examination, a practice mock link has been provided. Additionally, an informational booklet containing guidelines and instructions for the online exam is being distributed.
BMC Executive Assistant Selection Process 2025
निम्नस्तरीय कर्मचाऱ्यांमधून निवड प्रक्रिया राबवून भरल्या जाणाऱ्या ‘कार्यकारी सहाय्यक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदासाठी सेवा प्रवेश नियमांनुसार पात्रता व अटी/शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची संगणकावर आधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीतून, विहित आरक्षणानुसार, निवड यादी खालील निकषांनुसार तयार करण्यात येईल.
(अ) ‘कार्यकारी सहाय्यक’ या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा स्तर पदवी परीक्षेच्या समकक्ष असेल. मात्र, मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा स्तर उच्च माध्यमिक शालांत (इयत्ता 12 वी) परीक्षेच्या समकक्ष असेल. प्रश्नपत्रिकेची रचना पुढील स्वरूपाची असेल.
‘कार्यकारी सहाय्यक’ पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्ता यादीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
(ब) जर वरील ‘अ’ च्या निकषांनुसार दोन किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण असतील, तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला उमेदवाराकडे असलेल्या उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य दिले जाईल.
BMC Executive Assistant Exam Pattern 2025
अ. क्र | चाचणी | प्रश्न | गुण | 40% नुसार प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुणसंख्या | एकूण उत्तीर्ण गुणसंख्या | वेळ |
1 | मराठी भाषा व व्याकरण | 25 | 50 | 20 | प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळणे आवश्यक. तथापि,एकूण गुणांची बेरीज 45% असणे आवश्यक आहे. | 100 मिनिटे |
2 | इंग्रजी भाषा व व्याकरण | 25 | 50 | 20 |
| 100 मिनिटे |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | 20 |
| 100 मिनिटे |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 | 20 |
| 100 मिनिटे |
BMC Executive Assistant Syllabus 2025
- सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी तसेच इतर विषयाशी निगडीत प्रश्न अंर्तभूत असतील.
- बौध्दिक चाचणी परीक्षेचे स्वरुप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल.
- इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून व मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल.
- मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.
परीक्षा केंद्रांसंबंधी नियमावली:
(अ) उमेदवारांनी संबंधित प्रवेशपत्रात नमूद केलेल्या ठिकाणीच ऑनलाइन परीक्षा द्यावी.
(ब) परीक्षा केंद्र, ठिकाण, तारीख किंवा सत्र यामध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. प्रवेशपत्रामध्ये दिलेली माहिती अंतिम राहील.
(क) प्रशासकीय आवश्यकतेनुसार परीक्षा आयोजक संस्थेला परीक्षा केंद्र, ठिकाण, तारीख किंवा सत्र बदलण्याचा अधिकार राहील.
(ड) उमेदवारांना स्वतःच्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. परीक्षेदरम्यान उद्भवलेल्या कोणत्याही इजा किंवा नुकसानासाठी परीक्षा आयोजक संस्था जबाबदार राहणार नाही.
(इ) प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांना परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रवेशपत्रावरील रिपोर्टिंग वेळ ही परीक्षेच्या आधीची असून, विविध औपचारिकता जसे की कागदपत्रांची पडताळणी, बायोमेट्रिक प्रक्रिया इत्यादी पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान 1 तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षेचा कालावधी 100 मिनिटांचा असेल.