ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern – महिला बालविकास मुख्यसेविका भरती परीक्षा संदर्भात संपूर्ण माहिती
ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern 2024 – 2025
ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern:महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत मुख्यसेविका नागरी प्रकल्प (गट-क संवर्ग) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीसाठी एकूण 102 रिक्त पदे असून, परीक्षा पूर्णतः वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात (CBT) असेल. उमेदवारांना 90 मिनिटांत 100 प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यामध्ये 0.25 गुणांची नकारात्मक गुणपद्धती देखील लागू असेल. या परीक्षेत सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व लॉजिकल रीझनिंग, संख्याशास्त्र व गणित, मराठी व इंग्रजी भाषा कौशल्य, तसेच महिला व बाल विकासाशी संबंधित विशेष प्रश्नांचा समावेश असेल. महाराष्ट्र व भारताच्या इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, तसेच महिला सक्षमीकरण व बालकांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. सर्व उमेदवारांनी https://www.icds.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावेत. अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल, आणि सर्व सूचना व अपडेट्स याच संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशित केल्या जातील.
महिला व बाल विकास विभाग – एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य (मुख्यसेविका नागरी प्रकल्प) भरतीसाठी गट-क संवर्गाचे परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत…तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून Formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी formwalaa.in/syllabus.php फॉलो करा:
ICDS Mukyasevika Exam Pattern 2025
क्रमांक | गटाचे नाव | विभागाचे नाव | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | गट अ | इंग्रजी भाषा 1 | 5 | 10 |
2 | गट अ | मराठी भाषा 1 | 5 | 10 |
3 | गट अ | सामान्य ज्ञान 1 | 10 | 20 |
4 | गट अ | एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे 1 | 10 | 20 |
5 | गट अ | पोषण अभियान 1 | 5 | 10 |
6 | गट अ | गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित 1 | 10 | 20 |
7 | गट अ | संगणक ज्ञान 1 | 5 | 10 |
8 | गट ब | इंग्रजी भाषा 2 | 5 | 10 |
9 | गट ब | मराठी भाषा 2 | 5 | 10 |
10 | गट ब | सामान्य ज्ञान 2 | 10 | 20 |
11 | गट ब | एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे 2 | 10 | 20 |
12 | गट ब | पोषण अभियान 2 | 5 | 10 |
13 | गट ब | गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित 2 | 10 | 20 |
14 | गट ब | संगणक ज्ञान 2 | 5 | 10 |
|
| एकूण | 100 | 200 |
- उमेदवाराला 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटे दिले जातील.
- प्रश्न हे इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध असतील.दिलेले प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉप - डाउनमधील View वर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो.
- एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल. तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात याकडे लक्ष असू द्यावे.कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका.
- प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील.त्यापैकी फक्त 1 अचूक उत्तर असेल.
- चुकीच्या उत्तरासाठी 0.5 नकारात्मक गुण असतील.
- एखाद्या प्रश्नांचा इंग्रजी आणि मराठी आवृत्यामध्ये विसंगती असल्यास इंग्रजी आवृत्तीतील मजकुराला प्राधान्य
- देऊन त्याला ग्राह्य धरण्यात येईल.
- मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न विचारात घेतला जाईल.
परीक्षा दिनांक : 14 फेब्रुवारी 2025 शिफ्ट – पहिली तांत्रिक : पोषण अभियान 2 ते 5, राष्ट्रीय पोषण अभियान, महिला व बाल विकास यावर आधारित प्रश्न, बेटी बचाव बेटी पढाओ यावर प्रश्न ICDS : एकात्मिक बाल विकास सेवा योजना यावर प्रश्न, बाल सुधारणा कायदा यावर प्रश्न, योजनेचे वर्ष विचारलेले. संगणक : मध्यम ते अवघड स्वरूप. English : passage -०३ प्रश्न, antonym, Synonyms, Error, Parajumble मराठी : उतारा -०३ तीन प्रश्न, समानार्थी शब्द, वाक्यांचे उपयोग, मिश्र वाक्य Aptitude & Reasoning : Number series-02, Simplification-04, coding-decoding, Blood Relation-03, Alphanumeric series
परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यांत येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यांत येणार आहे. सत्र । व अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यांत येऊन त्याचे समानीकरण (Normalization) करणेचे बाबत TCS कंपनीकडून देण्यांत आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केले आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.
पेपर विषय | पात्रता | भाषा | प्रश्न संख्या | गुण | वेळ | परीक्षेचे स्वरूप |
इंग्रजी | पदवी | इंग्रजी | 10 | 20 | 1 तास 30 मिनिटे | वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न |
मराठी | पदवी | मराठी | 10 | 20 | दीड तास | वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न |
सामान्य ज्ञान | पदवी | मराठी | 20 | 40 | दिव्यांग उमेदवारांना 2 तास | वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न |
एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे | पदवी | मराठी | 20 | 40 | 2 तास | वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न |
पोषण अभियान | पदवी | मराठी | 10 | 20 | 2 तास | वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न |
गणित, बुध्दीमत्ता चाचणी व अंकगणित | पदवी | मराठी | 20 | 40 | 2 तास | वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न |
संगणक ज्ञान | पदवी | मराठी | 10 | 20 | 2 तास | वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न |
एकूण | -- | -- | 100 | 200 | -- | -- |
ICDS Mukhyasevika Syllabus 2025
विषय | अभ्यासक्रम |
इंग्रजी भाषा कौशल्य | - व्याकरण: Articles, Prepositions, Tenses, Verbs, Adjectives, Adverbs - शब्दसंग्रह: Synonyms, Antonyms, Idioms and Phrases, Proverbs - वाचनसमज: Paragraph Comprehension, Sentence Formation, Translation (English to Marathi and vice-versa) - वाक्यरचना: Spotting Errors, Sentence Correction |
मराठी भाषा कौशल्य | - मराठी व्याकरण: नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, काळ, विभक्ती, वचन - शब्दसंग्रह: समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार - वाक्यरचना: शुद्धलेखन, वाक्यांश, वाक्यरचना, वाक्याचे प्रकार - वाचनसमज: गद्य लेखन, अनुच्छेदावर आधारित प्रश्न |
सामान्य ज्ञान | - भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास: स्वातंत्र्य संग्राम, समाजसुधारक, महत्त्वाच्या घटना - भूगोल: महाराष्ट्राचे व भारताचे भौगोलिक वैशिष्ट्ये, नद्या, पर्वत, हवामान - अर्थशास्त्र: भारताची आर्थिक प्रणाली, चालू आर्थिक योजना, विमा, बँकिंग - चालू घडामोडी: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या बातम्या, क्रीडा, पुरस्का |
एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे | - बाल विकासाचे महत्त्वाचे मुद्दे: बालकांचे पोषण, शिक्षण, आरोग्य सेवा - महिला व बालकांचे हक्क: पोक्सो कायदा, बाल हक्क आयोग, महिला सुरक्षा योजना - सरकारी योजना: ICDS (Integrated Child Development Services), महिला सक्षमीकरण योजना, मिशन इंद्रधनुष |
पोषण अभियान | - पोषणाबाबत प्राथमिक माहिती: संतुलित आहार, पोषक घटक, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रीएंट्स - बाल पोषण: शिशू व बाल आहार, बालकांमधील कुपोषणाची लक्षणे व निवारण - सरकारी योजना: पोषण अभियानाची उद्दिष्टे, अन्न वितरण, आहाराच्या सुधारणा |
गणित, बुध्दीमत्ता चाचणी व अंकगणित | - अंकगणित: सरासरी, टक्केवारी, गुणोत्तर आणि प्रमाण, लाभ व तोटा, साधारण व चक्रवाढ व्याज - तर्कशक्ती: Problems on Series, Coding-Decoding, Blood Relations, Directions - गणितीय क्षमता: Squares and Cubes, Simplifications, Ratio Proportion, Mixtures |
संगणक ज्ञान | - संगणक मूलभूत माहिती: Operating Systems, Basic Functions, Input and Output Devices - एम.एस. ऑफिस: MS Word, MS Excel, MS PowerPoint चे वापर - इंटरनेट आणि ई-मेल: इंटरनेट सेवा, ब्राउझिंग, सुरक्षितता, ई-मेल वापर - डेटा प्रोसेसिंग: डेटा एंट्री, स्प्रेडशीट, डेटा मॅनेजमेंट |