Lekha Koshagar Bharti Syllabus And Exam Pattern : कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षा २०२४

Lekha Koshagar Bharti Syllabus:

कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षा २०२४ साठी उमेदवारांना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार प्रमुख विषयांवर आधारित तयारी करावी लागेल. मराठी विषयामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्याकरण, म्हणी-प्रचार व उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातील, तर इंग्रजीत व्याकरण, वाक्यरचना, शब्दसंग्रह आणि उताऱ्यांच्या आकलनावर भर दिला जाईल. सामान्य ज्ञानाच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटना, राज्यव्यवस्था, महाराष्ट्र व भारताचा इतिहास, भूगोल, पर्यावरणीय प्रश्न, सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र यांचा समावेश असेल. याशिवाय चालू घडामोडी व माहिती अधिकार अधिनियम, २००५ यासंबंधित अद्ययावत माहितीही आवश्यक आहे. बौद्धिक चाचणीत उमेदवारांच्या तर्कशक्ती व संख्यात्मक कौशल्यांची चाचणी घेतली जाईल, ज्यामध्ये अंकगणित व सांख्यिकीसंबंधी प्रश्न विचारले जातील. अभ्यासक्रमातील सर्व घटक व्यवस्थित समजून घेतल्यास आणि योग्य सराव केल्यास यश प्राप्त होण्यास मदत होईल. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण  महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी formwalaa.in/exam फॉलो करा:


महाराष्ट्र शासन कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षा २०२४: स्वरूप आणि अभ्यासक्रम


कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षा २०२४ संगणक आधारित (Computer Based Test) पद्धतीने आयोजित केली जाईल, ज्यामध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. परीक्षेत एकूण १०० प्रश्न असतील आणि उत्तर देण्यासाठी २ तासांचा वेळ दिला जाईल. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असून, एकूण गुणसंख्या २०० असेल.


मराठी व इंग्रजी विषयांची पातळी उच्च माध्यमिक स्तरावर असणार आहे, तर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पदवी स्तरावर असेल. मराठी विषयाची परीक्षा फक्त मराठी भाषेत होईल, इंग्रजी विषयाची परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत, तर सामान्य ज्ञान व अंकगणिताचे प्रश्न मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असतील. परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी नियोजित वेळेच्या किमान १ तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. हॉल तिकीट सोबत ठेवणे अनिवार्य आहे, जे पीडीएफ स्वरूपात असावे.


निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड त्यांच्या गुणांच्या आधारे केली जाईल. जर दोन उमेदवारांनी समान गुण मिळवले असतील, तर शासन निर्णयातील नियमांनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, सत्रांदरम्यानच्या परीक्षांमध्ये Normalization तंत्राचा वापर करून निकाल निश्चित केला जाईल.


परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे. परीक्षा दरम्यान शिस्त व सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. परीक्षेचा अभ्यास आणि तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन आणि अभ्यासक्रमाचे व्यवस्थित नियोजन करणे महत्त्वाचे आहे.


Lekha Koshagar Bharti Exam Pattern

परीक्षेचे स्वरूप 

1]प्रश्नपत्रिकेचे स्वरूप:

  • परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) घेतली जाईल.
  • प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकाराचे असतील.
  • एकूण प्रश्नसंख्या: १००
  • एकूण गुण: २००
  • कालावधी: २ तास (१२० मिनिटे)


2] प्रश्न आणि गुणविभागणी

विषयप्रश्नांची संख्याप्रत्येक प्रश्नाचे गुणएकूण गुणप्रश्नांचा दर्जा
मराठी25250उच्च माध्यमिक स्तर
इंग्रजी25250उच्च माध्यमिक स्तर
सामान्य ज्ञान25250पदवी स्तर
बौद्धिक चाचणी25250पदवी स्तर
एकुण 100-200-


3] विशेष सूचना:

  • मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून आणि इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून होईल.
  • सामान्य ज्ञान व अंकगणित विषयांची परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत होईल.
  • परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या १ तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • परीक्षेच्या वेळी पीडीएफ हॉल तिकीट आवश्यक राहील.


निवड प्रक्रिया

  • गुणांच्या आधारे निवड सूची तयार होईल.
  • किमान ४५% गुण अनिवार्य.
  • समान गुण असणाऱ्या उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार प्रक्रिया केली जाईल.
  • Normalization पद्धतीने अंतिम गुण निश्चित केले जातील.


Lekha Koshagar Bharti Syllabus | कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षा २०२४ अभ्यासक्रम – विषयवार तपशील


अ.क्रविषयअभ्यासाचा तपशील
1मराठीसर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उताऱ्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे.
2इंग्रजीCommon Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and Phrases and their Meaning, Comprehension of Passage.
3सामान्य ज्ञान

1) भारतीय राज्यघटना व संघराज्य व्यवस्था :

– घटनेची निर्मिती व प्रस्तावना,

– महत्वाची कलमे, केंद्र व राज्य संबंध,

– मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे कार्य.

2) आधुनिक भारताचा इतिहास:

– महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७),

– समाजसुधारक व त्यांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व वर्तमानपत्रे व शिक्षणाचा प्रभाव.

4भारत व महाराष्ट्राचा भूगोल

– प्राकृतिक भूगोल: नद्या, पर्वत, पठार, हवामानशास्त्र,

– मानवी भूगोल: लोकसंख्येचे स्थलांतर, ग्रामीण वस्त्या व त्यांचे प्रश्न.

5पर्यावरण

– मानवी विकास व पर्यावरण,

– नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण,

– प्रदूषणाचे प्रकार व उपाययोजना.

6सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान

– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र,

– दुरसंवेदन, GIS, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान.

7अर्थव्यवस्था व नियोजन

– समग्रलक्षी अर्थशास्त्र: सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार,

– भारतीय अर्थव्यवस्था: शेती, सहकार, औद्योगिक व सेवा क्षेत्र,

– महाराष्ट्राची अर्थव्यवस्था.

8चालू घडामोडीजागतिक, भारत आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटना.
9माहिती अधिकार अधिनियम २००५सुधारित व अद्यतनित माहिती अधिकार कायद्याचे स्वरूप व उपयोग.
10बौद्धिक चाचणी

– सामान्य बुध्दिमापन व आकलन,

– गणितीय ऑपरेशन्स: बेरीज, वजाबाकी, टक्केवारी, अपूर्णांक.


Lekha Koshagar Junior Accountant Syllabus


अ. क्र.विषय 
1मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उताऱ्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे.
2इंग्रजी : Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and Phrases and their Meaning, Comprehension of Passage.
3

सामान्य ज्ञान : 1) भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना,स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ,न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ ठळक वैशिष्टे केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये,राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोडे, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्री मंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्ये, राज्य विधीमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य , अधिकार, कार्य व कर्तव्ये, विविध समित्या इत्यादी.

2) आधूनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास - 

सामाजिक व आर्थिक  जागृती (1885-1947) महत्वाच्या व्यक्तीचे कार्य , समाज सुधारकांचे कार्य , स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे, शिक्षणाचा परिणाम , स्वातंत्र्य पूर्व काळातील ईतर समकालीन चळवळी . 

3) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल- 

भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक (Physical) भूगोल , मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग , हवामान शास्त्र (Climate) पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल,नद्या, पर्वत,पठार, विविध भुरुपे,राजकीय विभाग,प्रशासकीय विभाग,नैसर्गिक संपत्ती, वणे v खनिजे,मानवी व सामाजिक भूगोल,लोकसंख्या,लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इश्ट स्थानावरील (Destination) परिणाम,ग्रामीण वस्त्या , झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न

4) पर्यावरण -

मानवी विकास व पर्यावरण,पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषत वन संधारण, विविध प्रकारचे प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती,पर्यावरण संवर्धन कार्यरत असलेल्या राज्य,राष्ट्र,जागतिक पातळीवरील संघटना,संस्था इत्यादी

5) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान 

अ) भौतिकशास्त्र (Physics). ब)रसायनशास्त्र (Chemistry) क) प्राणीशास्त्र (Zoology) ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दुरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण,भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपाययोजना (Remote sensing,Aerial & drone photography, Geographic information system (GIS)and its application etc) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information & Communication Technology)

6) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र

1.समग्रलक्ष्मी अर्थशास्त्र 

1.1  समग्रलक्ष्मी अर्थशास्त्र.     1.2 वृध्दी आणि विकास.   1.3 सार्वजनिक वित्त 

1.4 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल.

2.भारतीय अर्थव्यवस्था

2.1 भारतीय अर्थव्यवस्था,भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा.

2.2 भारतीय शेती व ग्रामीण विकास   2.3 सहकार   2.4  मोद्रिक व वित्तीय क्षेत्र

2.5 सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था   2.6 उद्योग व सेवा क्षेत्र    2.7पायाभूत सुविधा विकास

2.8 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल     2.9 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था


7) चालू घडामोडी

जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील

8) माहिती अधिकार अधिनियम,2005

4

बुद्धिमापन चाचणी

1) सामान्य बुद्धिमापन व आकलन

उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

2) अंकगणित व सांख्यिकी

बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार,दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी


Leave A Reply