MahaPareshan Exam Pattern And Syllabus – विद्युत सहाय्यक (पारेषण), टंकलेखक, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 संपूर्ण अभ्यासक्रम
MahaPareshan Exam Pattern And Syllabus PDF
MahaPareshan Exam Pattern And Syllabus: Maharashtra State Electricity Transmission Company limited, (MSLDC), also known as MahaPareshan, which is the state’s power distribution utility. MahaPareshan conducts recruitment exams for the post of Vidyut Sahayak, which is a contractual position for a period of three years. The syllabus and exam pattern for the Vidyut Sahayak exam are available on the official website of MahaPareshan. The exam pattern consists of a written test of 100 marks, which is divided into four sections: Marathi Language, English Language, General Knowledge, and Electrical Engineering.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL), ज्याला महापारेषण असेही म्हणतात, जी राज्याची वीज वितरण उपयुक्तता आहे. महापारेषण विद्युत सहाय्यक पदासाठी भरती परीक्षा आयोजित करते, जी तीन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद आहे. विद्युत सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना महापारेषणच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. परीक्षेच्या पॅटर्नमध्ये 100 गुणांची लेखी चाचणी असते, जी मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी या चार विभागांमध्ये विभागली जाते. प्रत्येक विभागाचा अभ्यासक्रम अधिसूचना PDF मध्ये तपशीलवार दिलेला आहे.तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून Formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी Formwalaa.in/syllabus फॉलो करा.
Mahapareshan Tanklekhak Exam Pattern 2025
निवड पद्धती:
- अर्ज सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना लेखी/ऑनलाईन परीक्षेस बोलावण्यात येईल.
- ऑनलाइन परीक्षेसाठी उमेदवारांना बोळवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही.त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही.उमेदवाराची अंतिम निवड ही त्याच्या पत्रतेसंबंधीच्या कागदपत्राची पडताळणी करूनच केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवाराची वस्तुनिष्ठ स्वरूपाची (Objective Type) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.सादर परीक्षा ही पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता(Educational Qualification) व सामान्य अभियोग्याता चाचणी (General Aptitude) यावर आधारित राहील.ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र. | विषय/उपविषय | प्रश्न | गुण | परीक्षा कालावधी |
1 | विषयाचे ज्ञान(Professional Knowledge) | 50 | 110 | 120 मिनिटे |
2 | सामान्य अभीयोग्यता(General Aptitude) A) तर्कशक्ती (Reasoning) B) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) C) मराठी भाषा (Marathi Language) |
40 20 20 |
20 10 10 | 120 मिनिटे |
| एकूण | 80 | 40 |
|
| एकूण(1+२) | 130 | 150 |
|
निवड पध्दतीः Selection Process For MahaPareshan Vidyut Sahayak Exam 2025
१ ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेस बोलविण्यात येईल.
२ ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलविण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. उमेदवाराची अंतिम निवड ही त्याच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
३ अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Apptitude) यावर आधारित राहील. ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील.
निवड पध्दतीः Exam Pattern For MahaPareshan Vidyut Sahayak Exam 2025
अ. क्र. | विषय/उपविषय | प्रश्न | गुण | परीक्षा कालावधी |
1 | विजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान(Professional Knowledge) | 50 | 110 | 120 मिनिटे |
2 | सामान्य अभीयोग्यता(General Aptitude) A) तर्कशक्ती (Reasoning) B) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) C) मराठी भाषा (Marathi Language) |
40 20 20 |
20 10 10 | 120 मिनिटे |
| एकूण | 80 | 40 |
|
| एकूण(1+२) | 130 | 150 |
|
- उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती /दंड (Penalty) असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकुण गुणांच्या १/४ (०.२५%) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखादया प्रश्नाचे उत्तर न दिल्यास / रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती / दंड (Penalty) लागणार नाही.
- उमेदवाराने उपरोक्त नमुद विजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता व मराठी भाषा या सर्व विषयांचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त नमुद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात / उप विषयात उमेदवारास शून्य अथवा शून्यापेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यामुळे अशा उमेदवारांनी जरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले असले तरी त्यांचा निवडीकरीता विचार करण्यात येणार नाही याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि, नियुक्तीपुर्वी उमेदवाराची विहित शारीरीक व वैद्यकीय चाचणी व तपासणी करण्यात येईल. या शारीरिक चाचणी/वैद्यकीय तपासणीत उमेदवारास पात्र होणे आवश्यक राहिल. याबाबतचे निकष निवडीपुर्वी प्रशासनातर्फे स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येतील. त्यामुळे उमेदवाराने अशा विहित केलेल्या शारिरिक व वैद्यकिय चाचणी/तपासणीत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहिल व तसे न झाल्यास सदर उमेदवाराने जरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले असले तरी त्यांचा निवडीकरीता विचार करण्यात येणार नाही याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अंतिम गुणवत्ता यादी / निवडसुची तयार करताना सदर योजनेमधील तरतुदीनुसार महापारेषण कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांनी ऑनलाईन परिक्षेत एकुण १५० गुणांपैकी मिळविलेल्या गुणांचे रुपांतरण १०० गुणांत करून अशा रुपांतरीत गुणांमध्ये कौशल्य विकास योजने अंतर्गत जास्तीत जास्त २५ वाढीव गुण देऊन अंतिम गुणवत्ता यादी / निवडसुची तयार करण्यात येईल.
- तथापि, त्यांची निवड होवून ते कंपनीत रुजू झाल्यानंतर त्या पदाची सेवाजेष्ठता बनवितांना प्रकल्पग्रस्तांसह सर्व उमेदवारांनी केवळ लेखी परिक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे त्यांची सेवाजेष्ठता निश्चित करण्यात येईल.
- महापारेषण कंपनीमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत / काम केलेल्या तसेच विहीत अर्हता पुर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महापारेषण कंपनीत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत/काम केलेल्या तसेच विहीत अर्हता पुर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे त्यांनी ऑनलाईन परिक्षेत मिळविलेल्या गुणांमध्ये प्रतीवर्ष ०२ गुण या प्रमाणे ०५ वर्षांकरीता कमाल १० अतिरिक्त गुण देण्यात येतील व अशा प्रकारे ऑनलाईन परिक्षेत १५० पैकी मिळविलेले गुण व अतिरिक्त गुण यांचे रुपांतरण १०० गुणांत करून निवडसूचीत गुणवत्तेनुसार समावेश करण्यात येईल.
- अंतिम गुणवत्ता यादी / निवडसुची तयार करतांना उमेदवारास ऑनलाईन परिक्षेत एकुण १५० गुणांपैकी मिळविलेल्या गुणांचे रुपांतरण १०० गुणांत करुन अंतिम यादी / निवडसुची तयार करण्यात येईल. अंतिम निवड यादीत स्थान मिळविण्याकरीता खुल्या प्रवर्गातील उमेदवारास १०० गुणांपैकी कमीत कमी ३० गुण आणि मागास प्रवर्गातील व समांतर आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारास १०० गुणांपैकी कमीत कमी २० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. उमेदवाराने तेवढे कमीत कमी गुण प्राप्त न केल्यास त्याची निवड होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व निवड यादी त्या मर्यादेत राखण्यात येईल.
परिक्षा केंद्र : Mahatransco Vidyut Sahayak Exam Center
१ ऑनलाईन परिक्षेकरीता निश्चित केलेली परिक्षा केंद्रे खालील प्रमाणे असतील.
अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपुर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर.
MAHATRANSCO Electrical Assistant Syllabus
MAHATRANSCO Assistant Technician Exam Pattern 2023
Subjects | Maximum Question | Maximum Marks | Duration |
Test of Professional Knowledge | 50 | 110 | 120 minutes |
Test of Reasoning | 40 | 20 | 120 minutes |
Test Quantitative Aptitude | 20 | 10 | 120 minutes |
Test of Marathi Language | 20 | 10 | 120 minutes |
Total | 130 | 150 | 120 minutes |
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) च्या ऑनलाईन परीक्षेकरीता माहिती
उमेदवार देणार असलेल्या ऑन-लाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबीसंबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे.
खाली दर्शविल्याप्रमाणे ऑन-लाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील.
परीक्षेसाठी 120 मिनटांचा अवधी आहे, तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी साधारणतः 180 मिनिटे असावे लागेल ज्यामध्ये नोंद होणे (logging in), प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इत्यादींसाठी लागणा-या कालावधीचासुद्धा समावेश आहे. मराठी भाषेव्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या इंग्रजी आणि मराठीत असतील. उमेदवार दिलेल्या 120 मिनिटांत कोणत्याही प्रश्नावली मधील कोणताही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी, फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य/अचूक पर्यायावर ‘माउस-क्लिक’ करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी दंड असेल. आपल्याकडून चुकीचे उत्तर दिल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी त्या प्रश्नासाठी निर्धारित केलेल्या गुणांच्या एक चतुर्थाश गुण दंडस्वरूप कमी केले जातील.
कृपया ध्यानात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारांचे अधिक काठीण्य पातळीचे प्रश्न आढळतील, शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील.
Mahapareshan Technician-I Exam Pattern 2025 | Mahapareshan Technician-II Exam Pattern 2023
Subjects | Maximum Question | Maximum Marks | Duration |
Test of Professional Knowledge | 50 | 110 | 120 Minutes |
Test of Reasoning | 40 | 20 | 120 Minutes |
Test Quantitative Aptitude | 20 | 10 | 120 Minutes |
Test of Marathi Language | 20 | 10 | 120 Minutes |
Total | 130 | 150 | 120 Minutes |
Mahapareshan Recruitment Syllabus 2025| Mahapareshan Exam Syllabus 2025
MAHATRANSCO Assistant Technician Syllabus 2025
- Marathi
- Aptitude Test
- Quantitative Aptitude
मराठी
- मराठी व्याकरण जसे वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, संयुग, समानार्थी, विरुद्धार्थी वाक्ये, शब्दसंग्रहात शब्द आणि वाक्प्रचारांचा वापर
- प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
अभियोग्यता चाचणी
- खंड नफा आणि तोटा शर्यती आणि खेळ मिश्रण आणि नौका आणि प्रवाह क्रमपरिवर्तन आणि संयोजन सरलीकरण
- अंदाजे गुणोत्तर आणि प्रमाण साधे व्याज संभाव्यता सरासरी L.C.M आणि H.C.F वर समस्या क्रमांकावरील
- समस्या चक्रवाढ व्याज
- साधी समीकरणे चतुर्भुज
- समीकरणे निर्देशांक आणि Surds मासिकपाळी टक्केवारी
- क्षेत्रे वेळ आणि
- अंतर गाड्यांमधील समस्या ऑड मॅन आऊट संख्या आणि
- वय पाईप्स आणि टाके वेळ
- आणि काम भागीदारी परिमाणात्मक योग्यता संबंध
- आणि कार्ये लॉगरिदम भेद अनिश्चित पूर्णांक द्विपद प्रमेय मॅट्रिक्स निर्धारक
- त्रिमितीय भूमितीचा परिचय सरळ रेषा मंडळे कोनिक विभाग क्रमपरिवर्तन
- आणि संयोजन जटिल संख्या चतुर्भुज समीकरणे क्रम
- मालिका त्रिकोणमिती आयताकृती निर्देशांकांची कार्टेशियन प्रणाली आकडेवारी वेक्टर घातांक
- लॉगरिदमिक मालिका सेट
- सेट सिद्धांत संभाव्यता कार्य मर्यादा आणि सातत्य डेरिव्हेटिव्ह्जचे अनुप्रयोग
Mapareshan Technician-I Syllabus/Mapareshan Technician-II Syllabus
- Marathi
- Aptitude Test
- Quantitative Aptitude
मराठी
- मराठी व्याकरण जसे वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, संयुग, समानार्थी, विरुद्धार्थी वाक्ये, शब्दसंग्रहात शब्द
- वाक्प्रचारांचा वापर
- प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
अभियोग्यता चाचणी
- साधी समीकरणे
- चतुर्भुज समीकरणे निर्देशांक
- Surds मासिकपाळी टक्केवारी क्षेत्रे वेळ
- अंतर गाड्यांमधील समस्या ऑड मॅन आऊट संख्या
- वय पाईप्स आणि टाके वेळ
- काम भागीदारी गुणोत्तर
- प्रमाण साधे व्याज संभाव्यता सरासरी L.C.M आणि H.C.F वर समस्या क्रमांकावरील समस्या चक्रवाढ व्याज खंड नफा
- तोटा शर्यती आणि खेळ मिश्रण
- नौका
- प्रवाह क्रमपरिवर्तन
- संयोजन सरलीकरण आणि अंदाजे
Quantitative Aptitude
- त्रिमितीय भूमितीचा परिचय सरळ रेषा मंडळे कोनिक विभाग क्रमपरिवर्तन आणि संयोजन वेक्टर घातांक आणि लॉगरिदमिक मालिका सेट आणि सेट सिद्धांत संभाव्यता कार्य मर्यादा आणि सातत्य डेरिव्हेटिव्ह्जचे अनुप्रयोग संबंध आणि कार्ये लॉगरिदम जटिल संख्या चतुर्भुज समीकरणे क्रम आणि मालिका त्रिकोणमिती आयताकृती निर्देशांकांची कार्टेशियन प्रणाली आकडेवारी भेद अनिश्चित पूर्णांक द्विपद प्रमेय मॅट्रिक्स निर्धारक निश्चित इंटिग्रल्स