MIDC परीक्षा विश्लेषण 2025

MIDC परीक्षा विश्लेषण 2025, शिफ्ट 2


परीक्षेची काठीण्य पातळी, विश्लेषण, इत्यादी बद्दल माहिती पहा.


MIDC परीक्षा विश्लेषण 2025  

MIDC परीक्षा विश्लेषण 2025: MIDC 2023-24 भरती अंतर्गत दिनांक 30 मार्च 2024 रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 2 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 30 मार्च 2024 रोजी झालेल्या दुसऱ्या शिफ्टचे MIDC परीक्षा विश्लेषण 2024 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.


MIDC परीक्षा विश्लेषण 2025: विहंगावलोकन

MIDC परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. MIDC परीक्षा विश्लेषण 2025 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.


श्रेणीपरीक्षा विश्लेषण
विभागMIDC
भरतीचे नावMIDC भरती 2023-24
लेखाचे नावMIDC परीक्षा विश्लेषण 2024
MIDC परीक्षा विश्लेषण 2024शिफ्ट 2, 30 मार्च 2024


MIDC परीक्षा विश्लेषण 2025: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)

MIDC भरती 2024 अंतर्गत परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते  मध्यम स्वरुपाची होती. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.


अ. क्रविषयकाठीण्य पातळी
1मराठी भाषासोपी
2इंग्रजी भाषामध्यम
3सामान्य ज्ञान मध्यम
4बौद्धिक चाचणीमध्यम
5म.औ.वि. अधिनियममध्यम

एकूणमध्यम


विषयानुरूप MIDC परीक्षा विश्लेषण 2025 (शिफ्ट 2)

MIDC भरती 2024 अंतर्गत परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयावर प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.


मराठी विषयाचे विश्लेषण

MIDC भरती 2024 अंतर्गत परीक्षेत मराठी विषयावर प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • समास
  • प्रयोग
  • पुस्तक लेखक
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • म्हणी
  • वाक्प्रचार
  • शब्दसमूह
  • शब्दार्थ
  • तोडलेले वाक्य क्रमाने लावा


इंग्रजी विषयाचे विश्लेषण

MIDC भरती 2024 अंतर्गतपरीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात General Vocabulary, Sentence Structure, Grammar, Idioms and Phrases- their meaning and use, Comprehension इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • Articles
  • spelling
  • parajumble sentences
  • error finding
  • synonyms
  • antonyms


सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

MIDC भरती 2024 अंतर्गत सामान्य ज्ञान विषयाचे प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने चालू घडामोडी वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • विज्ञान – 1 प्रश्न
  • इतिहास – 1 प्रश्न
  • राज्यघटना – 1 प्रश्न
  • भूगोल – 1 प्रश्न
  • चालू घडामोडी- 2 प्रश्न


बौद्धिक चाचणी व अंकगणित विषयाचे विश्लेषण

MIDC भरती 2024 अंतर्गत परीक्षेत बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयात प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयात सामान्य बुध्दीमापन व आकलन, तर्क आधारीत प्रश्न आणि अंकगणित आधारीत प्रश्न इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • अक्षर मालिका –
  • अंकमालिका
  • बैठक व्यवस्था
  • समीकरण सोडवणे.
Leave A Reply