पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण

पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 1, 08 डिसेंबर 2023


08 डिसेंबर 2023 रोजी शिफ्ट 1 मध्ये लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेचे पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023 खाली दिले आहे. परीक्षेची काठीण्य पातळी, विषयानुसार विश्लेषण, इत्यादी बद्दल माहिती पहा.


पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023

पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023: पनवेल महानगरपालिका 2023 भरती अंतर्गत दिनांक 08 डिसेंबर 2023 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये लिपिक टंकलेखक च्या पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेची माहिती आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार लिपिक टंकलेखक च्या पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 08 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.


पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

पनवेल महानगरपालिका परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.


श्रेणीपरीक्षा विश्लेषण
विभागपनवेल महानगरपालिका
भरतीचे नावपनवेल महानगरपालिका भरती 2023
पदाचे नावलिपिक टंकलेखक
लेखाचे नावपनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023
पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023शिफ्ट 1, 08 डिसेंबर 2023
परीक्षेचा कालावधी2 तास
एकूण गुण200


पनवेल महानगरपालिका परीक्षेचे स्वरूप 2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक च्या पदांची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.


अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुणकालावधी
1मराठी भाषा25502 तास
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550

एकूण100200


पनवेल महानगरपालिका परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

पनवेल महानगरपालिका परीक्षा 2023 ही 08 डिसेंबर 2023 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. पनवेल महानगरपालिका शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.


शिफ्टपरीक्षेची वेळ
शिफ्ट 1सकाळी 09 ते 11.00
शिफ्ट 2दुपारी 01.00 ते 03.00
शिफ्ट 3संध्याकाळी 05.00. ते 07.00


पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक  पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते  मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्रविषयगुड अटेंम्टकाठीण्य पातळी
1मराठी भाषा23-24सोपी
2इंग्रजी भाषा22-23मध्यम
3सामान्य ज्ञान 20-21मध्यम
4बौद्धिक चाचणी21-22मध्यम

एकूण86-90

मध्यम


विषयानुरूप पनवेल महानगरपालिका परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक मधील पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.


मराठी विषयाचे विश्लेषण

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक मधील पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने समानार्थी, विरुद्धार्थी, प्रयोग इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेत विचारण्यात आलेले सर्व विभागांची माहिती खाली दिली आहे.


  • समानार्थी शब्द- 3 प्रश्न
  • विरुद्धार्थी शब्द – 2 प्रश्न
  • उद्देश्यविस्तार, विधेयविस्तार – 4-5 प्रश्न
  • प्रयोग- 2 प्रश्न
  • वाक्यरुपांतर- 2 प्रश्न


इंग्रजी विषयाचे विश्लेषण

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक मधील पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Parajumble, Synonym इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • Synonym- 2Qtn
  • Antonym- 2Qtn
  • Adjective- 2Qtn
  • Parajumble-2 Qtn
  • Short Passage- 2 Qtn


सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक मधील पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने चालू घडामोडी वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • चालू घडामोडी वर प्रश्न: जास्त प्रश्न
  • इतिहास 1 प्रश्न
  • भूगोल
  • राज्यघटना- 1प्रश्न
  • स्टॅटिक जी.के.-1प्रश्न


परीक्षेत आलेले प्रश्न खाली दिले आहेत

  • MANAS चे विस्तृत रूप?
  • AMRUT काय आहे?
  • 2016 युनेस्को जागतिक वारसास्थळ कोणते?
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?
  • मुलभूत कर्तव्यांवर एक प्रश्न


बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक मधील पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने काळ आणि काम, सरळव्याज इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • अंकमालिका – 2 प्रश्न
  • सहसंबंध – 2 प्रश्न
  • दिशा- 2 प्रश्न
  • विधान आणि निष्कर्ष – 2 प्रश्न
Leave A Reply