PCMC Recruitment Exam Pattern And Syllabus
PCMC Recruitment Exam Pattern And Syllabus.The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) in Maharashtra has announced an exam notice for 150 Fireman positions. The syllabus for this exam typically covers topics related to firefighting techniques, safety protocols, first aid, physical fitness, and general awareness. Candidates can download the PCMC Fire Extinguisher/Fireman Rescuer Exam Pattern and Syllabus from the provided link.
The selection process for the Fireman role includes a written exam followed by a physical fitness test and practical assessment of firefighting skills. It is crucial for candidates to thoroughly review the syllabus and exam pattern to prepare effectively. Candidates are also encouraged to work on their physical fitness to meet the requirements for the physical test.
This comprehensive approach will help aspirants prepare well and increase their chances of qualifying for the Fireman role in PCMC or similar organizations.
PCMC ने 150 फायरमन परीक्षेसाठी परीक्षा सूचना प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र, भारतातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये फायरमन पदासाठीच्या अभ्यासक्रमामध्ये सामान्यत: अग्निशमन, सुरक्षा उपाय, मूलभूत वैद्यकीय मदत, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामान्य जागरूकता या विषयांचा समावेश असतो. येथे तुम्हाला PCMC अग्निशामक/फायरमन रेस्क्यूअर अभ्यासक्रमाविषयी सामान्य रूपरेषा मिळेल. तुम्ही खालील लिंकवरून PCMC अग्निशामक/फायरमन रेस्क्यूर परीक्षा पॅटर्न डाउनलोड करू शकता. PCMC ने अग्निशामक/फायरमॅन रेस्क्यूर पदांसाठी लेखी परीक्षा तसेच अग्निशामक/फायरमन रेस्क्यूरसाठी शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार PCMC अग्निशामक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रमाबद्दल खाली दिलेले सर्व तपशील तपासू शकतात..तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून Formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी Formwalaa.in/syllabus फॉलो करा:
परिक्षेचे स्वरुप – PCMC Agnishaman Vimochak Exam Pattern 2025
अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर पदासाठी परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित केली जाईल. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी यांसारख्या विषयांवर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQ) असतील. परीक्षेत एकूण १०० प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला १ गुण दिला जाईल, त्यामुळे एकूण १०० गुण असतील. परीक्षेसाठी एकूण १२० मिनिटांचा वेळ दिला जाईल. ही परीक्षा पदाची शैक्षणिक पात्रता, भाषा ज्ञान, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, तसेच तांत्रिक ज्ञान यासंबंधी असणार आहे. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार (शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३- अ. दि. ०४/०५/२०२२) या परीक्षेचा आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले जाईल.
List Of Documents For PCMC Exam 2025- PCMC फायरमन परीक्षा 2025 साठी प्रमाणपत्राची महत्त्वाची यादी
The online exam will have objective multiple choice questions on Marathi, English, General Knowledge, Intelligence Test. 100 questions will be objective multiple choice (MCQ) format and each question will carry 01 marks. (Total Marks 100) A total duration of 120 minutes will be allowed for the examination. The online examination will be related to the educational qualification for the post of Fireman / Fireman Rescuer as well as language, general knowledge, intelligence test, technical knowledge etc. All candidates should note this.
पदाचे नाव | विषय(प्रश्न संख्या) | दर्जा | माध्यम | प्रश्न संख्या | गुण | कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर | मराठी(15) इंग्रजी(15) सामान्य ज्ञान(15) बौद्धिक चाचणी(15) | माध्यमिक शाळांत परीक्षेच्या दर्जासमान(10 वी) | मराठी व इंग्रजी | 60 | 60 | दोन तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
| अग्निशमन संबंधीत(40) | अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम दर्जासमान | मराठी व इंग्रजी | 40 | 40 | दोन तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
एकूण परीक्षा 2 टप्प्यात घेण्यात येईल
Download PCMC Mahanagarpalika Fireman Rescuer Syllabus 2025 PDF
अ.क्र. | विषय | तपशील |
1 | मराठी | समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द |
2 | इंग्रजी | Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning |
3 | सामान्य ज्ञान | दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया) |
4 | बौद्धिक चाचणी | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
PCMC Fire Extinguisher/Fireman Rescuer exam Physical Criteria
शारीरिक अर्हता:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन वीमोचक / फायरमन रेस्कुअर या पदाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराकडे उपरोक्त शैक्षणिक अर्हतासोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे.
अ. क्र. | बाब | पुरुष | महिला |
1 | उंची | 165 से.मी(अनवाणी) | 162 से.मी(अनवाणी) |
2 | वजन | 50 Kg | 50 Kg |
3 | छाती | न फुगवता-81 से.मी फुगवून- 86 से.मी (किमान 5 से.मी फुगवणे आवश्यक राहील) | महिला उमेदवारासाठी लागू नाही |
4 | दृष्टी | सामान्य(वर्णधता आजारापासून मुक्त असावा) | सामान्य(वर्णधता आजारापासून मुक्त असावा) |
5 | ठेवण | उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा | उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा |
पुरुष
अ. क्र. | तपशील | गुण |
1 | 1600 मी धावणे | 30 |
2 | जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लांबलेल्या (46.4 वरील उंचीच्या) अल्यमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकी पर्यंत वर चडून त्याच शिडीने खाली उतरणे.(आरंभ रेशेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल) | 20 |
3 | 50Kg. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवून दिलेल्या चोकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे. | 20 |
4 | 20 फूट उंचीपर्यंत रस्सिवर चडने व उतरणे | 20 |
5 | पूल- अप्स 20 | 10 |
| एकूण गुण | 100 |
महिला
अ. क्र. | तपशील | गुण |
1 | 800 मी धावणे | 30 |
2 | जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लांबलेल्या (46.4 वरील उंचीच्या) अल्यमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकी पर्यंत वर चडून त्याच शिडीने खाली उतरणे.(आरंभ रेशेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल) | 20 |
3 | 40Kg. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवून दिलेल्या चोकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे. | 20 |
4 | गोळा फेक | 10 |
5 | लांब उडी | 10 |
6 | पुश अप 10 | 10 |
| एकूण गुण | 100 |
PCMC Physical Criteria For Female
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्कूअर या गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जाहिरात क्र.670/2024 अन्वये अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्कूअर या पदाच्या सविस्तर जाहिरातीमध्ये महिला उमेदवाराची उंची 162 सेमी तसेच वजन 50Kg नमूद करण्यात आले आहे.
अग्निशमन सेवा संचालनालय,मुंबई यांनी दिनांक 30/04/2024 रोजीच्या पत्रांवये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात अग्निशमन विमोचक या पदाकरीता महिला उमेदवार करिता किमान उंची 157 सेमी आणि किमान वजन 46 Kg याबाबत सुधारणा करणेकामी कळवलीले आहे.
PCMC Group B And Group C Syllabus PDF
PCMC Recruitment Exam Pattern And Syllabus PDF – Pimpri Chinchwad Municipal Corporation has published a Notification for 386 vacant posts of Group B And Group C Posts. Another mega recruitment after Pune Mahanagarpalika. Here is a great chance for candidates who are preparing for Mahanagarpalika Exam 2025. Under this recruitment, Municipal Corporation is going to fill Additional Legal Adviser, Legal Officer, Deputy Chief Fire Officer, Divisional Fire Officer, Park Superintendent (Trees), Assistant Park Superintendent, Park Inspector, Horticulture Supervisor, Court Clerk, Animal Keeper, Social Worker, Civil Engineering Assistant, Clerk, Health Inspector, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical) Posts. Likewise, PMC, PCMC will likely conduct PCMC Online Exam 2022 to shortlist candidates. On this page we are providing you with Short Details as the Full PCMC PDF is yet to be published by Department. PCMC Bharti 2025 Mock Test & Free Test Series Papers, Previous Year Papers will be available Soon on MahaBharti Exam. Check PCMC Recruitment Exam Pattern And Syllabus, PCMC Group B C Syllabus 2025, Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti Exam Pattern, PCMC Bharti Syllabus, PCMC Clerk Bharti Syllabus And Exam Pattern PDF at below:
PCMC recruitment exam pattern and syllabus pdf download
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गट ब आणि गट क पदांच्या 386 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. पुणे महानगरपालिकेनंतर आणखी एक मेगा भरती जाहीर झालेली आहे . महानगरपालिका भरती 2025 साठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत महानगरपालिका अतिरिक्त कायदेशीर सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी पार्क अधीक्षक (वृक्ष), सहायक उद्यान अधीक्षक, पार्क इन्स्पेक्टर, हॉर्टिकल्चर पर्यवेक्षक, कोर्ट लिपिक, पशुपालक, सामाजिक कार्यकर्ता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) ही पदे भरणार आहे . पुणे महानगरपालिकेप्रमाणे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी PCMC ऑनलाइन परीक्षा 2025 आयोजित करू शकते. त्या अनुषंगाने आम्ही येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप PDF मध्ये उपलब्ध करून देत आहोत. PCMC अभ्यासक्रम व परीक्षेबद्दल सर्व संबंधित तपशिलांसाठी उमेदवार Forrmwalaa.in/syllabus या वेबसाईट ला भेट देत राहा.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून Formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी Formwalaa.in/syllabus फॉलो करा:
पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होतील | PCMC Bharti Exam date
PCMC लिपिक पदांसाठीची परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. महापालिकेच्या गट ब आणि गट क मधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी महापालिकेने अर्ज मागवले असून, ३८६ पदांसाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज आले आहेत. यापैकी सुमारे ९० हजार उमेदवारांनी परीक्षेचे शुल्क भरले आहे.
सर्व पदांसाठीच्या परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर आलेल्या अर्जांमुळे परीक्षेच्या नियोजनास विलंब होत आहे. तरी लवकरच प्रशासन यासंबंधी अंतिम निर्णय घेऊन वेळापत्रक जाहीर करेल.
PCMC Syllabus 2025 & Exam Pattern PDF Download
विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे बिंदू नामावली तपासण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.आरक्षण तपासणीत काही बदल होवू शकतात.संपूर्ण संवर्गातील तपासणी झाल्यानंतर आरक्षणात काही बदल असल्यास तो प्रसिद्ध केला जाईल.त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा मार्ग मोकळा होईल.
PCMC Bharti 2025 Selection Process|pcmc recruitment exam pattern and syllabus pdf in marathi |PCMC Syllabus 2025
निवड पद्धती
जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाण पेक्षा जास्त असेल आणि अर्ज सदर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोईस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता;अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्र.1222/ प्र. क्र 54/ का.13- अ, दि 04/05/2022 अन्वये सदर पदासाठी मोखीक परीक्षा घेतली जाणार नाही.
ऑनलाइन परीक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी (परीक्षेचा निकाल) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.aapcmcindiaa.gov.in या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
ऑनलाइन परीक्षेचे ठिकाण,दिनांक, वेळ तसेच बैठक व्यवस्था याची माहिती महापालिकेच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.तसेच अर्ज केलेल्या उमेदवारास त्यांची अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर स्वतंत्र्य प्रवेशपत्र(Admit-Card) पाठवणेत येणार आहे.परीक्षेचे प्रवेशपत्र मनपा संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.भरती प्रक्रिया संदर्भातील इतर सर्व माहिती व त्यानुष्वने होणाऱ्या बदलाबाबतची सर्व माहिती केवळ महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.या व्यतिरिक्त कोणत्याही माध्यमाद्वारे भरती प्रक्रियेची माहिती उपलब्ध होणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
समान गुण असणाऱ्या उमेदवाराचा गुणवत्ता क्रम , सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक 1222/प्र. क्र.54/क्र 13 अ. दि 04/05/2022 मधील निकषावर लावला जाईल.
गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या वेळी उमेदवाराने ओळखपत्र पुरावा(आधार कार्ड, पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स)सोबत आणणे बंधनकारक आहे.त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही.
PCMC Bharti Exam Pattern And Syllabus PDF
PCMC Bharti Exam Pattern For Additional Legal Adviser, Legal Officer, Court Lipik Post | PCMC Exam Pattern 2025
विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण |
इंग्रजी | 15 | 30 |
मराठी | 15 | 30 |
सामान्य ज्ञान | 15 | 30 |
बौद्धिक चाचणी | 15 | 30 |
विधी संबंधित | 40 | 80 |
एकूण | 100 प्रश्न | 200 गुण |