SJSA Maharashtra Syllabus and Exam Pattern 2025
ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहेत. या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ, परीक्षेत, प्रश्नपत्रिकेत चार कालबद्ध विभाग (A, B, C आणि D) असल्यास, प्रत्येक विभागात २५ प्रश्न असतील आणि ३० मिनिटे वेळ असेल. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. याव्यतिरिक्त, उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील. ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करण्यासाठी MOCK TEST LINK सदर भरती प्रक्रियेच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर सुविधेचा लाभ घेण्याबाबत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे. उमेदवारांना प्रश्नसंच किंवा उत्तरतालिका या संदर्भात आक्षेप/निवेदन सादर करावयाचे असल्यास त्याबाबत ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रश्नसंच किंवा उत्तरतालिका या संदर्भात आक्षेप केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येणार आहेत इतर कोणत्याही पध्दतीने सादर केलेले (पत्राव्दारे, ईमेल, मेसेजेस) आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
Sr.No. | Subject Name / विषयाचे नाव | Group Name |
|
|
|
|
| Group A | Group B | Group C | Group D |
1 | Marathi / मराठी | 6 Questions | 6 Questions | 6 Questions | 6 Questions |
2 | English / इंग्रजी | 6 Questions | 6 Questions | 6 Questions | 6 Questions |
3 | General knowledge + Current Affairs / सामान्य ज्ञान + चालू घडामोडी | 6 Questions | 6 Questions | 6 Questions | 6 Questions |
4 | Maths + Intelligent / गणित + बुद्धिमान | 6 Questions | 6 Questions | 6 Questions | 6 Questions |
| Number Of Questions / प्रश्नांची संख्या - Total 100 Questions | 25 Questions | 25 Questions | 25 Questions | 25 Questions |
| Group Wise Timing / विभागानुसार वेळ - Total 120 Minutes | 30 Minutes | 30 Minutes | 30 Minutes | 30 Minutes |
परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राचे प्रश्नसंच स्वतंत्र असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठीण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण/समतुल्य करण्याबाबतचे (Normalization) सूत्र या प्रसिध्दीपत्रकासह जोडण्यात आलेले आहे. सदर (Normalization) गुणांकन पध्दत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. . सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यात येत असून उमदेवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे/परीक्षा पास करुन देण्याचे किंवा तत्सम स्वरुपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा.
SJSA Maharashtra Syllabus: Samaj Kalyan Bharti Syllabus 2025 Download – Senior Social Welfare Inspector, Housekeeper / Superintendent (Female), Housekeeper / Superintendent (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Class-3 Cadre under Establishment of Social Welfare Commissionerate, Maharashtra State Pune Online applications are invited from the eligible and interested candidates possessing the qualification / qualifications required for the said post to fill the vacant posts mentioned in the table below. Candidates who are going to apply for this recruitment can check the Syllabus, Selection Procedure and Exam Format for these posts below. Selection of candidates will be based on computer based examination.
Samaj Kalyan Vibhag Selection Process
निवडीची पध्दत :- खालील पध्दतीचा अवलंब करुन ऑनलाईन गुण ठरविले जातात.
१) वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतले जातील.
परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रामध्ये गुण समायोजित करुन समतुल्य करण्यात येतील.
३) गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
४) संगणक आधारित (Computer Based Online Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशिल खालील प्रमाणे राहील.
SJSA Maharashtra Syllabus: समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे ते खाली या पदांकरिता अभ्यासक्रम, निवड पद्धती व परीक्षेचे स्वरूप तपासू शकता. उमेदवारांची निवड हि कंप्युटर बेस्ड परीक्षेवर आधारित असेल. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून Formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी https://formwalaa.in/syllabus.php फॉलो करा:
SJSA Maharashtra Exam Pattern 2025
अ. क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
1 | मराठी | 25 | 50 |
2 | इंग्रजी | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
| एकूण | 100 | 200 |
SJSA Maharashtra Exam Syllabus 2025
अ.क्र. | विषय | तपशील |
1 | मराठी | समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द |
2 | इंग्रजी | Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning |
3 | सामान्य ज्ञान | दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया) |
4 | बौद्धिक चाचणी | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |