WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 1, 02 जानेवारी 2024


02/01/2024 रोजी शिफ्ट 1 मध्येदप्तर कारकून/ मोजणीदार पदाच्या परीक्षेचे सविस्तर WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 खाली दिले आहे. परीक्षेची काठीण्य पातळी, विश्लेषण, इत्यादी बद्दल माहिती पहा.


WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023: WRD जलसंपदा विभाग 2023 भरती अंतर्गत दिनांक 02 जानेवारी 2024 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर माहिती आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 02 जानेवारी 2024 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.


WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

WRD जलसंपदा विभाग परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.


श्रेणीपरीक्षा विश्लेषण
विभागWRD जलसंपदा विभाग
भरतीचे नावWRD जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नावदप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक
लेखाचे नावWRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023
WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023शिफ्ट 1, 02 जानेवारी 2024
परीक्षेचा कालावधी02 तास
एकूण गुण200


WRD जलसंपदा विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.


अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुणकालावधी
1मराठी भाषा25502 तास
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550

एकूण100200


WRD जलसंपदा विभाग परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

WRD जलसंपदा विभाग परीक्षा 2023 ही 02 जानेवारी 2024 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. WRD जलसंपदा विभाग पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.


शिफ्टपरीक्षेची वेळ
शिफ्ट 1सकाळी 09 ते 11.00
शिफ्ट 2दुपारी 01.00 ते 03.00
शिफ्ट 3संध्याकाळी 05.00. ते 07.00


WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते  मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.


अ. क्रविषयगुड अटेंम्टकाठीण्य पातळी
1मराठी भाषा22-24सोपी
2इंग्रजी भाषा21-23मध्यम
3सामान्य ज्ञान20-22मध्यम
4बौद्धिक चाचणी21-23मध्यम

एकूण84-92मध्यम


विषयानुरूप WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.


मराठी विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.


इंग्रजी विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात General Vocabulary, Sentence Structure, Grammar, Idioms and Phrases- their meaning and use, Comprehension इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.


सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने चालू घडामोडी वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.


परीक्षेत आलेले प्रश्न खाली दिले आहेत

  • अरवली पर्वत दक्षिण भागात कोणत्या राज्यपर्यंत विस्तारला आहे?
  • ग्रामीण भागात मायक्रोफायनान्स पुरवणारी संस्था कोणती ?
  • महाराष्ट्र राज्य चे हरित आच्छादन अभियान कोणते आहे?
  • राजस्थान मधील बागोर कशासाठी प्रसिद्ध आहे?
  • हरितगृह वायू कोणता ?
  • कोणत्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मुलभूत हक्कान्मधून वगळण्यात आला?
  • राज्य निर्मिती, सीमा फेरफार अनुछेद
  • NRLM ची संस्था कोण चालवते ?
  • UMED – कधी सुरू झाला ?
  • महाराष्ट्र विधानसभामध्ये आमदारांची संख्या किती आहे?
  • विधानसभा आमदारांचा कार्यकाल किती वर्षे असतो?
  • सन 1398 मध्ये तैमुर वर हला झाला त्यावेळी दिल्ली उध्वस्त झाल्यावर सत्ता कुणाची होती?
  • महाराष्ट्र राज्य चे ग्रामीण पत, विमा आणि शेती उपत्न सुधारण्यासाठी चा उपक्रम


बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात सामान्य बुध्दीमापन व आकलन, तर्क आधारीत प्रश्न आणि अंकगणित आधारीत प्रश्न इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

Leave A Reply