Tehsildar Selection Process: आजच्या या आर्टिकल मध्ये आपण तहसीलदार कसे बनायचे? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सोबत तहसीलदार होण्यासाठी कोण कोणते पात्रता निकष लागू असणार? नियम अटी काय आहेत, निवड कशी होते? याची पण माहिती लेखात दिली आहे.जे विद्यार्थी अथवा उमेदवार तहसीलदार बनण्यासाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी माहिती आहे. त्यामुळे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक शब्द न शब्द वाचून घ्या.
Tehsildar Selection Process In Marathi
तहसीलदार या पदासाठी उमेदवाराला शासनातर्फे घेतली जाणारी शासकीय सेवा प्रवेश परीक्षा MPSC (राज्य सेवा परीक्षा) द्यावी लागते. यामध्ये उमेदवाराला त्याच्या गुणवत्तेनुसार पात्र केले जाते, तुम्हाला जर तहसीलदार बनायचे असेल तर MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागते.
तहसीलदार या पदासाठी सरकारद्वारे तब्बल 55,100 ते 1,75,100 + इतर भत्ते एवढा पगार दिला जातो. पदोन्नती झाली तर पगारामध्ये आणखीन वाढ सुद्धा केली जाते. सोबतच महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घर भाडे भत्ता, वैद्यकीय तसेच पेन्शन यादेखील सुविधा तहसीलदाराला दिल्या जातात.
MPSC परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला तहसीलदार पदासाठी बोलावले जाते, तेथे मुलाखत घेतली जाते त्यानंतर मुलाखतीच्या आधारे इतर काही टेस्ट घेऊन उमेदवार निवडतात. तुमची जर तहसीलदार होण्याची खरंच इच्छा असेल तर या पोस्टमध्ये जी माहिती दिली आहे ती नक्की काळजीपूर्वक वाचा, आणि त्यानुसार तयारीला लागा.
Tehsildar Qualification Details
तहसीलदार या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे किंवा फॉर्म भरायचा आहे, त्यांना शासनाद्वारे लावून दिलेल्या शैक्षणिक पात्रता निकषांचे पालन करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार शैक्षणिक दृष्ट्या पात्र असेल तर त्याला तहसीलदार बनता येते.
शैक्षणिक पात्रते सोबतच अर्जदार उमेदवाराला वयोमर्यादा निकषांचे देखील पालन करावे लागते. जर उमेदवार रिझर्व कॅटेगरी मधील असेल तर त्याला यामध्ये काही प्रमाणात सूट दिली जाते, त्याची माहिती तुम्ही तहसीलदार भरती निघाल्यानंतर मिळवू शकता.
■ Education Qualification Criteria
- तहसीलदार बनण्यासाठी अर्जदार उमेदवाराची शिक्षण हे किमान प्राथमिक झालेले असावे.
- अर्जदाराने ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केले असावे.
- अर्जदाराला स्थानिक क्षेत्रातील भाषा वाचता लिहिता बोलता येणे आवश्यक आहे.
■ Age Limit
- तहसीलदार पदासाठी जो उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत त्यांचे किमान वय हे 21 असावे.
- तर जास्तीत जास्त वय हे 40 पर्यंत असावे, रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाते.
- वयोमर्यादा ही 21 ते 40 वर्षे अशी आहे, म्हणजे ज्या उमेदवाराची ग्रॅज्युएशन झाले आहे त्यांना तहसीलदार होता येते.
Tehsildar Exam Details
तहसीलदार पदासाठी दोन परीक्षा घेतल्या जातात, यामध्ये पहिली परीक्षा Preliminary Exam असते आणि दुसरी Mains Exam असते.
- पूर्व परीक्षा – ४०० गुण
- मुख्य परीक्षा (Main Exam)– ८०० गुण, ही परीक्षा पास झाल्यावर पदांचा क्रम टाकावा लागतो. त्यात SDM, तहसीलदार, ACP असे जे Available पद असतील ते तुम्ही निवडू शकता.
- मुलाखत (Interview) – १०० गुण
मुख्य परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळाले त्यावरून तुमची पोस्ट ठरणार. पोस्ट मिळाल्यानंतर पुणे इथे यशदा ही सरकारी organization आहे, इथे तुम्हाला ३ महिने तहसीलदारची पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. त्यानंतर तुमची प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड होते, प्रोबेशन ऑफिसर चा Period संपल्यावर तहसीलदार या पदासाठी तुमचे पोस्टिंग होते.
Tehsildar Preliminary Exam Pattern
विषय | प्रश्न | एकूण मार्क्स | वेळ |
General Studies (GS) | 100 | 200 | 2 घंटे |
Civil Services Aptitude Test (CSAT) | 80 | 200 | 2 घंटे |
१८० प्रश्न | 400 मार्क |
Tehsildar Preliminary Exam Syllabus
● General Studies (GS)
● Civil Services Aptitude Test (CSAT)
Tehsildar Mains Exam Pattern
विषय | एकूण मार्क्स | वेळ |
Marathi Language | 100 | 3 घंटे |
English Language | 100 | 3 घंटे |
GS Paper I: History, Geography, and Agriculture | 150 | 2 घंटे |
GS Paper II: Indian Polity and Laws | 150 | 2 घंटे |
GS Paper III: Human Resource Development and Human Rights | 150 | 2 घंटे |
GS Paper IV: Science and Technology, Economy | 150 | 2 घंटे |
800 |
Tehsildar Mains Exam Syllabus
1.मराठी :भारतीय कायदा आणि राजकारण
2.इंग्रजी : मानवी हक्क
3.भारताचा इतिहास (महाराष्ट्र) : मानव संसाधन विकास
4.भूगोल : भारताची अर्थव्यवस्था
5.कृषी : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Tehsildar Selection Process
तहसीलदार पदासाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यांमध्ये केली जाते, यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला Preliminary Exam घेतली जाते नंतर Mains Exam असते आणि शेवटी मुलाखत घेऊन पात्र उमेदवाराची निवड केली जाते.
1.पूर्व परीक्षा
2.मुख्य परीक्षा
3.मुलाखत
4.निवड
वर आपण तहसीलदार भरतीसाठी परीक्षा कशा दिल्या जातात त्याचा अभ्यासक्रम आणि इतर बाबी जाणून घेतल्या. येथे मी तुम्हाला मुलाखती संदर्भात सांगणार आहे, तलाठी भरती मध्ये मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाते.
मुलाखतीला बोलल्यानंतर तिथे उमेदवाराला अभ्यासक्रमा संबंधी तसेच इतर बाबी संबंधी देखील महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारल्यानंतर उमेदवाराचा परीक्षेतील Score तपासला जातो, मुलाखती ला देखील 100 मार्क असतात, मुलाखती मधील Performance नुसार उमेदवार तहसीलदार पदासाठी योग्य असेल तर त्याचे सिलेक्शन होते. निवड प्रक्रिया हि पूर्णपणे MPSC अंतर्गत पार पडते.