Maharashtra Van Vibhag Vanrakshak Physical Test: वन विभागामार्फत घेण्यात येणारी वनरक्षक पदासाठी भरती ह्यामध्ये केवळ लेखी परीक्षा नव्हे तर शारीरिक चाचणीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता, फिटनेस, धावणे आणि चालणे इत्यादी पात्रता तपासली जाते. आजच्या या पोस्ट च्या माध्यमातून आपण महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 मध्ये Physical Test बद्दल सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Vanrakshak Bharti Physical Test शारीरिक पात्रता
उंची, वजन, छाती (Vanrakshak Height Weight Chest Criteria) शारीरिक पात्रता, Vanrakshak Height and Physical Test Qualification Details
पुरुष उमेदवारांसाठी – Male Candidate
शारिरीक माप | पात्रता |
उंची | किमान 163 से.मी |
छाती | 79 से.मी (फुगवून 84 से.मी) |
वजन | वैद्यकीय मापानुसार वयोगट व उंचीनुसार योग्य वजन |
स्त्री उमेदवारांसाठी – Female Candidate
शारिरीक माप | पात्रता |
उंची | किमान 150 से.मी |
छाती | लागू नाही |
वजन | वैद्यकीय मापानुसार वयोगट व उंचीनुसार योग्य वजन |
अनुसूचित जाती/जमाती सवलत
- पुरुषांची उंची: 152.5 से.मी
- स्त्री उंची: 145 से.मी
- छाती: समान निकष लागू
Maharashtra Vanrakshak Physical Test मैदानी चाचणी
पुरुष उमेदवारांसाठी – Male Candidate
चाचणी | अंतर | वेळ | गुण |
धावणे | 5 किमी | 30 मिनिटे | 80 |
पुरुष उमेदवारांसाठी खालील प्रमाणे मार्क्स असतील:

स्त्री उमेदवारांसाठी – Female Candidate
चाचणी | अंतर | वेळ | गुण |
धावणे | 3 किमी | 25 मिनिटे | 80 |
स्त्री उमेदवारांसाठी खालील प्रमाणे मार्क्स असतील:

अंतिम चालण्याची चाचणी
ही चाचणी अंतिम गुणवत्ता यादीसाठी आवश्यक आहे.
Candidate | चालण्याचे अंतर | वेळ मर्यादा |
पुरुष | 25 किमी | 4 तासात |
महिला | 16 किमी | 4 तासात |
Note: या चाचणीत अपयशी झाल्यास उमेदवाराची निवड रद्द केली जाऊ शकते.
Vanrakshak Eye Vision Test दृष्टी चाचणी
उमेदवाराने चष्मा न घालता स्पष्ट दृष्टी आवश्यक आहे, कलर ब्लाइंडनेस, न्यूनदृष्टी/दूरदृष्टी यासारखे दोष आढळल्यास निवड रद्द केली जाऊ शकते.

वनरक्षक भरती अंतिम गुणवत्ता यादी Final Merit List
- लेखी परीक्षा (Vanrakshak CBT Test 120 गुण)
- शारीरिक चाचणी (Vanrakshak Physical Test 80 गुण)
या दोन्ही घटकांचे एकत्रित गुण घेऊन अंतिम Merit List तयार केली जाते.
Van Vibhag Bharti Physical Test Overview for Vanrakshak Post
Test | पुरुष | स्त्री | SC/ST सवलत |
उंची | 163 से.मी | 150 से.मी | पुरुष 152.5, महिला 145 से.मी |
छाती | 79 से.मी (फुगवल्यावर +5 से.मी) | लागू नाही | पुरुष 79 + 5 से.मी, महिला — |
वजन | वैद्यकीय मापानुसार | वैद्यकीय मापानुसार | वैद्यकीय मापानुसार |
धावणे | 5 किमी – 30 मिनिटांत (80 गुण) | 3 किमी – 25 मिनिटांत (80 गुण) | – |
चालणे / धावणे | 25 किमी – 4 तासात | 16 किमी – 4 तासात | – |
डोळे | नैसर्गिक दृष्टी आवश्यक | नैसर्गिक दृष्टीची आवश्यक | – |
महाराष्ट्र वनरक्षक भरतीतील शारीरिक चाचणी ही संपूर्ण निवड प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम टप्पा आहे. यामध्ये उमेद्वारानें योग्य वेळेपासून धावणे, चालणे, व्यायाम, आणि फिटनेस यांचा नियमित सराव केल्यास तुम्ही ह्यामध्ये चांगले मार्क्स मिळवून सहजपणे पास होऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Vanrakshak Physical Test टेस्टमध्ये अपयश आल्यास पुढे जाता येईल का?
नाही, कोणत्याही टप्प्यात नापास झाल्यास पुढील टप्प्यास पात्रता राहत नाही.
वनरक्षक शारीरिक चाचणीत मुलाखत असते का?
नाही, फक्त CBT + फिजिकल टेस्ट व Document Verification असते.
तुम्हाला अजून Vanrakshak Physical Test संदर्भात विचारायचे असल्यास, खाली कमेंट करा किंवा आमच्या वेबसाईटवर नियमित भेट द्या!
Visit – Formwalaa
Source – Maharashtra Forest Department
Sir physics test madhe ky ky ghetat दात 3 किडलेत चालतात का
Nahi chalat