Gramsevak Eligibility in Marathi: ग्रामसेवक कसे बनावे? ग्रामसेवक पदासाठी पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न, वयोमर्यादा यासह संपूर्ण माहिती या पोस्ट च्या माध्यमातून जाणून घ्या. 12वी नंतर सरकारी नोकरीची उत्तम संधी!
ग्रामसेवक (Gramsevak) हे एक चांगले आणि प्रतिष्ठेचे पद मानले जाते. ग्रामीण भागात विकासकामे राबवण्याची जबाबदारी आणि गावाचा मुख्य संपर्कक म्हणून या पडला ओळखले जाते. अनेक विद्यार्थीना ग्रामसेवक होण्यासाठी काय करावे लागते? त्याची पात्रता काय असते? अभ्यासक्रम कसा असतो? हे माहीतच नाही तर आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून ग्रामसेवक पदाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तेही पात्रतेपासून ते निवड प्रक्रियेपर्यंत सर्व काही सविस्तर!
Gramsevak Job Details…
ग्रामसेवक म्हणजे काय?
ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतीचा सचिव, जो प्रामुख्याने गाव पातळीवर सरकारी योजना अंमलात आणण्याचे काम करतो. त्याच्यावर ग्रामसभेचे आयोजन, विकासकामांचे निरीक्षण आणि सरकारी कागदपत्रांचे व्यवस्थापन अशी महत्त्वाची जबाबदारी असते. थोडक्यात सांगायचं झाला तर ग्रामसेवक म्हणजे गावाचा शासकीय प्रतिनिधीच.
Gramsevak Eligibility in Marathi ग्रामसेवक भरतीसाठी राज्य शासनाद्वारे काही पात्रता निकष जारी केलेले आहेत, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या सर्व बाबी असतात. ह्या दोन्ही Criteria ची माहिती खाली Separate Section मध्ये दिली आहे त्यामुळे काळजीपूर्वक आर्टिकल वाचा.
ग्रामसेवक होण्यासाठी शैक्षणिक पात्रता
Gramsevak Eligibility in Marathi ग्रामसेवक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अट खालीलप्रमाणे:
किमान 12वी उत्तीर्ण (60% गुणांसह) किंवा 60% टक्के गुण नसतील तर, कृषी क्षेत्रातील विषयांमध्ये पदविका किंवा पदवी झालेली असावी
अथवा खालील पैकी कोणत्याही पात्र अभ्यासक्रमातील उत्तीर्णता:
- D.Ed / B.Ed
- MCVC
- Diploma in Agriculture / Engineering
- ITI (Agri / Civil / Tech)
- B.Tech / B.Sc. (Agri)
MS-CIT आवश्यक (नसल्यास निवडीनंतर 6 महिन्यांत सादर करणे आवश्यक)
Note: उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि उमेदवाराने कृषी क्षेत्रातील पदवी मिळवली असेल, तर उमेदवाराला प्राधान्य दिले जाऊ शकते.
ग्रामसेवक पदासाठी वयोमर्यादा
ग्रामसेवक पदासाठी महाराष्ट्र शासनाने ठराविक अटी लावून दिल्या आहेत, त्यामध्ये वयाची अट अट ही प्रमुख आहे. Gramsevak Eligibility in Marathi
प्रवर्ग | किमान वय | कमाल वय |
अनारक्षित | 18 वर्षे | 38 वर्षे |
आरक्षित | 18 वर्षे | 45 वर्षे |
Note: जाहिरातीनुसार वयोमर्यादेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो, त्यामुळे नवीन जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर ती नक्की पहा.
Gram sevak Exam Details
ग्रामसेवक भरती परीक्षा व अभ्यासक्रम
ग्रामसेवक भरती परीक्षा 200 गुणांची असते. एकूण 100 प्रश्न, प्रत्येकी 2 गुण, आणि परीक्षेसाठी 1 तास 30 मिनिटे (90 मिनिटे) वेळ असतो. Gramsevak Bharti Syllabus –
विषय | प्रश्नसंख्या | गुण |
मराठी | 15 | 30 |
इंग्रजी | 15 | 30 |
सामान्य ज्ञान | 15 | 30 |
गणित व बुद्धिमत्ता | 15 | 30 |
कृषी / तांत्रिक | 40 | 80 |
एकूण | 100 | 200 |
कृषी / तांत्रिक हा सर्वात जास्त गुणांचा विषय आहे. त्यामुळे या विषयावर भर देणे गरजेचे आहे.
Gram Sevak Selection Process
ग्रामसेवक भरती अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे असणार आहे. यामधे काही टप्पे आहेत, त्यानुसार जे उमेदवार या सर्व स्टेज मध्ये उत्तीर्ण होतील त्यांना ग्राम सेवक पदावर नियुक्ती मिळणार आहे. Gramsevak Eligibility in Marathi
- अर्जदार उमेदवारांची पात्रता पहिली जाइल.
- पात्रता तपासून झाल्यावर उमेदवारांना Gram Sevak Bharti साठी लेखी परीक्षा द्यावी लागते.
- परीक्षेत पास झाल्यावर पुढे उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी केली जाते, यामधे जर Verification दरम्यान काही Invalid Information आढळली तर अशा उमेदवारांना तात्काळ बाद केले जाते.
- नंतर मेरिट लिस्ट काढली जाते.
- मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल केवळ अशाच उमेदवारांना ग्राम सेवक पदासाठी निवडले जाते.
ग्रामसेवक परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके
ग्रामसेवक परीक्षेच्या तयारी साठी काही पुस्तके, या परीक्षेमध्ये पाच वेगवेगळ्या विषयांचा समावेश असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी खाली दिलेली बुकलिस्ट पुस्तके अनुभवी विद्यार्थी जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या रेफेरेंस ने तयार करण्यात आलेली आहे.
मराठी विषयासाठी:
- सामान्य मराठी व्याकरण – लक्ष्मण पाटील
- स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – संजीव पाटील पब्लिकेशन
- बालभारतीचे जुने पुस्तक (10वीचे)
इंग्रजी विषयासाठी:
- Objective General English – R.S. Agarwal / S.P. Bakshi
- 10वी व 12वी इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे पुनरावलोकन
सामान्य ज्ञान:
- Lucent’s General Knowledge (मराठी अनुवाद उपलब्ध)
- भारतीय व महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र – बालभारती पुस्तके
बुद्धिमत्ता व गणितासाठी:
- Quantitative Aptitude – R.S. Agarwal
- Fast Track Objective Arithmetic – Rajesh Verma
कृषी / तांत्रिक विषय:
- Diploma / B.Sc. Agri Notes – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ग्रामसेवक पदाची जबाबदारी काय असते?
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतो. त्याचाकडे ग्रामसभेचे नियोजन करणे, सरकारी योजनांचे नियोजन व अंमलबजावणी करणे, लोकांच्या तक्रारींचे निवारण करणे, विकासकामांची तपासणी आणि अहवाल तयार करणे हि सर्व कामे ग्रामसेवकला पाहावी लागतात.
ग्रामसेवक पद ही केवळ सरकारी नोकरी नाही तर ती एक जबाबदारीची आणि लोकसेवेची संधी आहे. जर तुम्हाला ग्रामीण भागात काम करण्याची आवड असेल, तर आजपासूनच तयारीला सुरुवात करा. योग्य मार्गदर्शन आणि मेहनत केल्यास तुम्हीही नक्कीच ग्रामसेवक बानू शकतात.
संबंधित प्रश्न (FAQ)
Q. ग्रामसेवक होण्यासाठी किमान पात्रता काय आहे?
किमान 12 वी उत्तीर्ण (60% गुणांसह) किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
Q. ग्रामसेवक परीक्षा कोणत्या विषयांवर आधारित असते?
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित-बुद्धिमत्ता, कृषी/तांत्रिक.
Q. MS-CIT आवश्यक आहे का?
होय, पण नियुक्तीनंतर 6 महिन्यांत सादर करता येतो.
Q. ग्रामसेवकाचे काम काय असते?
सरकारी योजना अंमलात आणणे, ग्रामसभा आयोजन, कागदपत्रे तयार करणे इ.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..