FORMWALA ऑनलाईन | पुण्यातील काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथे आज परीक्षा केंद्रावर (दिनांक 10) मोठा गोंधळ बघायला मिळाला. सारथी, बार्टी ,महाज्योती संशोध संस्थेचे सीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिका असतील नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर सर्वाधिकरित्या निषेध करत बहिष्कार नोंदवला. व सर्व विद्यार्थ्यांनी संतप्त होऊन परीक्षेवर बहिष्कार टाकला.
परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना बंदडांबून ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
किंबहुना या परीक्षेतील गोंधळाची ही दुसरी वेळ आहे. या आधी 24 डिसेंबरला परीक्षा झाली होती त्यावेळी सेटचा 2019 मधला पेपर आधी होता तसाच जसाच्या तसा घेण्यात आला त्यामुळे 24 तारखेची परीक्षा रद्द करण्यात आली. या घटनेला पंधरा दिवस झाले नाही तोपर्यंत हा परत गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षा बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले.