Ahilyanagar Kotwal Bharti 2025: अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल विभागाअंतर्गत “महसूल सेवक (कोतवाल)” पदांची भरती जाहीर झाली आहे. एकूण 158 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, केवळ स्थानिक रहिवासी उमेदवार पात्र आहेत. या भरतीमुळे ग्रामीण भागातील तरुणांना शासकीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
Ahilyanagar Kotwal Bharti 2025 जाहीर! पाथर्डी, संगमनेर, राहाता, श्रीगोंदा आदी तालुक्यांमध्ये कोतवाल पदांच्या 158 जागा. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.
जाहिरात: उपविभागीय अधिकारी यांच्या मान्यतेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती संस्था: Sub-Divisional Officer, Ahilyanagar
नोकरी ठिकाण: अहिल्यानगर, महाराष्ट्र
एकूण पदसंख्या: 158
उपविभागीय अधिकारी यांच्या मान्यते अंतर्गत सरकारी नोकरीची संधी!..
अहिल्यानगर ‘महसूल सेवक’ भरती 2025: जिल्ह्यात कोतवाल पदांसाठी भरती सुरु
पद (Total: 158 जागा)
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | तालुका | पद संख्या |
1 | महसूल सेवक (कोतवाल) | पाथर्डी | 13 |
संगमनेर | 16 | ||
श्रीरामपूर | 08 | ||
शेवगाव | 07 | ||
श्रीगोंदा | 20 | ||
राहाता | 07 | ||
राहुरी | 12 | ||
पारनेर | 21 | ||
जामखेड | 06 | ||
नेवासा | 10 | ||
कोपरगांव | 10 | ||
अहिल्यानगर | 14 | ||
कर्जत | 14 | ||
Total | 158 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Kotwal Bharti Education Qualification
किमान 04थी उत्तीर्ण
वयोमर्यादा (Age Limit)
Ahilyanagar Kotwal Bharti 2025 Age Limit: 07 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे
अर्ज शुल्क (Application Fee)
अहिल्यानगर कोतवाल भरती Application Fee Structure
खुला प्रवर्ग:₹600/-
मागासवर्गीय: ₹500/-
Important Dates
अर्ज सुरू : दिनांक 08 जुलै 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत. (कोतवाल भरती 2025)
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 जुलै 2025.
नोकरीचे ठिकाण (Job Location)
अहिल्यानगर, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण अहिल्यानगर मध्ये कुठेही पोस्टिंग दिले जाईल.
Ahilyanagar Kotwal Bharti 2025 – Important Links
भरतीच्या महत्वाच्या लिंक
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी इच्छूक उमेदवार पुढील नमूद केलेल्या अटीस पात्र असणे आवश्यक आहे :
Ahilyanagar Kotwal Bharti 2025
1) महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठी उमेदवारांचे वय दिनांक 07/07/2025 रोजी 18 ते 40 या वयोगटातील असावे. (Kotwal Bharti 2025
2) अर्जदार यांनी ज्या सजेतील पदासाठी अर्ज सादर केला आहे, त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी आवश्यक राहील
3) महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता 4 थी पास इतकी असावी.
4) अर्जदार हा महसूल सेवक (कोतवाल) पदाची कर्तव्ये पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. (Kotwal Bharti 2025)
5) मागासवर्गीय उमेदवाराने पुरावा म्हणून सक्षम प्राधिका-यांनी दिलेले जात प्रमाणपत्र छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल.
6) अर्जदार व्यक्ती विरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नसावी अथवा उमेदवारास कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दंड अगर शिक्षा झालेलो नसावी, याबाबत संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल.
7) महसूल सेवक (कोतवाल) म्हणून नेमणूक करतांना इतर सर्व गोष्टी बरोबर असतील तर त्या सजेतील पुर्वीच्या कोतवालांच्या वारसांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देण्यात येईल. तसेच कोतवालांच्या वारसा व्यतिरिक्त इतर दोन उमेदवारांचे अंतिम गुण सारखे असल्यास उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 13 जुन 2018 मधील नमुद निकषावर लावला जाईल.
8) महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी नियुक्ती देण्याकामी उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक असेल. (कोतवाल भरती 2025)
9) अर्जदार उमेदवारास वर नमुद केलेल्या पात्रतेसह लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल.
10) उमेदवारांना लेखी परिक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे मुळ कागदपत्रे तपासणी कामी तात्पुरती निवड यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल तसेच कागदपत्रे तपासणी अंती अंतिम निवड यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. (Kotwal Bharti 2025)
11) उमेदवारांना लेखी परिक्षेला व कागदपत्रे पडताळणीकामी उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास खर्च वा इतर खर्च दिला जाणार नाही.
12) उमेदवार अनुसुचित जाती / जमाती व खुल्या प्रवर्गातील उमेदवारा व्यतिरिक्त असल्यास अशा उमेदवारांना प्रगत उन्नत गटात मोडत नसलेबाबत सक्षम अधिका-याचे (नॉन क्रिमीलेअर) दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र कागदपत्र छाननीचे वेळी जोडणे आवश्यक राहील. असे प्रमाणपत्र छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल. (Kotwal Bharti 2025)
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.